औंध/वार्ताहर
जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने रोम ( इटली) येथे दिनांक 23 ते 31 जुलै या कालावधीत होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून देवाची आळंदी ता खेड येथील प्रा दिनेश गुंड यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने निवड करण्यात आली.
दिनेश गुंड हे जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच आहेत. आतापर्यंत त्यानी अनेक जागतिक , आशियाई , ऑलम्पिक पात्रता ,विश्वचषक स्पर्धेत पंच म्हणून न्यायदानाचे उत्कृष्ट काम केले आहे.
100 हुन अधिक राष्ट्रीय स्पर्धा व 48 आंतरराष्ट्रीय स्पर्धा इतका प्रचंड अनुभव असलेले ते महाराष्ट्रातील एकमेव पंच आहेत ही त्यांची 49 वी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहे. त्यांच्या निवडीबद्दल कुस्ती शौकिनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.