Tarun Bharat

भारतीय टेनिसबॉल क्रिकेट संघात ऋतिक सावंत याची निवड

Selection of Hrithik Sawant in Indian Tennis Ball Cricket Team

सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावचा सुपुत्र ऋतिक सत्यवान सावंत याची नेपाळ येथे होणाऱ्या आशिया टेनिस बॉल क्रिकेट कप स्पर्धेसाठी भारतीय टेनिसबॉल क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान नेपाळ येथील पोखरा स्टेडियम येथे होणार आहे.


गेल्यावर्षी जम्मू काश्मिर येथे झालेल्या २८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत ऋतिक सावंत याने महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत केलेल्या अष्टपैलू खेळाची दखल घेऊन त्याची राष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. तसेच तमिळनाडूत कन्याकुमारी येथे झालेल्या नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये त्याने महाराष्ट्राच्या टीमचे नेतृत्व केले होते.


ऋतिक सावंत उत्कृष्ट किक बॉक्सिंग खेळाडू असून त्याने अनेक जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकाविल्यानंतर राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ओटवणे/ प्रतिनिधी

Related Stories

मुंबईच्यामहापौर बनल्या कोविड योद्धय़ा

NIKHIL_N

गोवा बोर्डाने मानले सिंधुदुर्ग प्रशासनाचे आभार

NIKHIL_N

मद्य दुकानांसमोर तळीरामांची मोठी गर्दी

Patil_p

मित्रांसमवेत नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

Anuja Kudatarkar

दापोली बसस्थानकातील दुकानाला आग

Patil_p

असनियेचे ग्रामदैवत माऊली वार्षिक जत्रोत्सव आज

Anuja Kudatarkar