Tarun Bharat

खानापूर ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची थ्रो बॉल राज्य स्पर्धेसाठी निवड

Advertisements

वार्ताहर /खानापूर

बेळगाव जिल्हास्तरीय थ्रोबॉल सांघिक स्पर्धा बी. व्ही. संबरगी कॉलेज पारिश्वाड येथे पार पडल्या. मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व कॉलेज खानापूरच्या विद्यार्थिनीनी मुलींच्या थ्रो-बॉल संघाने विजेतेपद पटकावले.

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत एकूण सहा तालुक्मयातील संघांनी भाग घेतला. थ्रो बॉल स्पर्धेत रामदुर्ग तालुका व बैलहोंगल तालुक्मयातील थ्रो बॉल संघांना मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात ताराराणी कॉलेजच्या संघाने कित्तूर संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. या विजयी खेळाडूंची राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कॉलेजच्यावतीने या यशस्वी खेळाडूंचा कौतुक सोहळा कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मराठा मंडळचे संचालक पी. आर. गुरव, एस. एस. पाटील तसेच प्रल्हाद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य एन. ए. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राध्यापक अरविंद पाटील यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.

 अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एन. ए. पाटील यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले व  राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विजयी स्पर्धकांना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू (हलगेकर) यांचे प्रोत्साहन तसेच प्राचार्य एन. ए. पाटील, क्रीडा समन्वयक प्रा. अरविंद पाटील, संघ व्यवस्थापक प्राध्यापक टी. आर. जाधव, प्रशिक्षक भीमसेन व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन
लाभले. सर्व उपस्थितांचे आभार व सूत्रसंचालन प्राध्यापक. एन. एम. सनदी यांनी केले.

Related Stories

बाजारपेठेत मंगळवारी पुन्हा खरेदीसाठी उसळली गर्दी

Amit Kulkarni

मराठी भाषिकांच्या निवडीबद्दल जाहीर आभार

Patil_p

उद्यान की जनावरांचे कुरण?

Amit Kulkarni

सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया ठप्प; परप्रांतियांना फटका

Patil_p

Kolhapur : दोन्ही राज्यामध्ये प्रशासकीय समन्वय साधण्याचे राज्यपालांच्या बैठकीत निर्देश

Abhijeet Khandekar

उद्योग खात्रीत काम करणाऱया कामगाराची दोन बोटे निकामी

Patil_p
error: Content is protected !!