वार्ताहर /किणये
कावळेवाडी गावचा सुपुत्र रवळनाथ श्रीधर कणबरकरने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गटात विजेतेपद पटकाविले. त्याच्या या कामगिरीमुळे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.
रवळनाथ हा बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनचा विद्यार्थी असून तो आठवीमध्ये शिकत आहे. त्याला क्रीडा शिक्षक रामलिंग पाटील यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक सिद्धेश्वर तुर्केवाडकर, मंगल पाटील आदींचे प्रोत्साहन मिळत आहे.