बेळगाव प्रतिनिधी – बेळगावच्या आर्किटेक्ट स्नेहल हुन्नूरकर यांच्या “बायोबेस्ड पॅव्हेलियन ” प्रकल्पाची नेदरलँड मधील ” द टच डिझाईन वीक 2022″ मध्ये निवड झाली आहे. ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज ‘ या नामांकनाखाली असणाऱ्या 23 प्रकल्पांपैकी स्नेहल यांचा एक प्रकल्प आहे. यामध्ये फ्लॅक्स सारख्या जैविक घटकांचा वापर केला आहे. त्यामुळे विघटन पुनर्वापर व पुनर्चलन या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
स्नेहलिया जी आय टी मधून आर्किटेक च्या पदवीधर झाले आहेत त्यानंतर जर्मनीमधील बाओ हाऊस व नेदरलँड मधील तांत्रिक महाविद्यातून महाविद्यालयातून त्यांनी मास्टरची पदवी घेतली. हाईडहोवन येथील विद्यालिपीठात बांधकाम क्षेत्रात जैविक पदार्थांचा वापर कसा होईल, यावर डॉक्टर फास मुनेन व आर्किटेक्ट टॉम व्हिगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अभ्यास करत आहेत. तसेच भारतातील स्टुडिओ 13 या वास्तूशिल्पी फर्मची धुरा पुष्कराज कार्यकर्त्यांच्या सह सांभाळत आहेत. बेळगावचे वकील कै.के.बी.हुन्नूरकर व सुरेखा हुन्नूरकर यांच्या त्या कन्या आहेत.
Previous Articleमाडखोल देवस्थानचे मानकरी दाजी राऊळ यांचे निधन
Next Article गुंजीत भरदिवसा घरफोडी