क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गुवाहाटी आसाम येथे 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या पॅरालिम्पिक नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेत मुतगे गावचा सुपुत्र स्वस्तिक नारायण पाटीलने पोहण्याच्या स्पर्धेत विविध प्रकारांत तीन सुवर्णासह पाच पदके मिळविली.
स्वस्तिकने 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण, 200 मी. वैयक्तिक मिडलेमध्ये सुवर्ण, 100 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य, 4ƒ100 मी. फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण, 4ƒ100 मी. मिडले रिलेमध्ये रौप्यपदक मिळविले.. स्वस्तिकने यापूर्वीही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अनेक पदके मिळविली आहेत. त्याची निवड खेलो इंडिया टीममध्ये झाली आहे. स्वस्तिक हा सध्या अलाहाबाद येथील एमएनएनआयटी कॉलेजमध्ये बीईचे शिक्षण घेत आहे. प्रशिक्षक उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तो नियमित सराव करत आहे. मुतगे येथील व्यापारी नारायण पाटील यांचा तो चिरंजीव आहे.