Tarun Bharat

जागतिक स्केटिंग निवड चाचणीसाठी बेळगावच्या तिघांची निवड

बेळगाव : पंजाब येथील पंचकुला व पतियाळा येथे जागतिक स्केटिंग स्पर्धेसाठी रोलर स्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाने बेळगावच्या 3 स्केटिंगपटूंची निवड झाली आहे.

पंजाब येथे होणाऱया जागतिक स्केटिंग स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी बेळगावच्या मंजुनाथ मंडोळकर, यशपाल पुरोहित व भक्ती हिंडलगेकर या तिघांची इनलाईन हॉकीसाठी निवड करण्यात आली आहे. गोवावेस येथील मनपा रोटरी जलतरण समोरील स्केटींग सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात या तिघांसह सूर्यकांत हिंडलगेकर, विनोद बामणे, बसवराज कोरीशेट्टी, चोकसिंग पुरोहित, श्रीकांत मेंडके, श्रीमती मेंडके, लिना कोरिशेट्टी, अमित मुगळी, महेश पुरोहित, देवराज पुरोहित, दिनेश पुरोहित, किंजल पुरोहित यांचाही सत्कार करण्यात आला. निवड झालेले स्केटिंगपटू लिंगराज स्केटींग, मनपा स्केटींग, गुडशेफर्ड स्केटींग रिंकवर सराव करीत असून त्यांना स्केटींग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

जिल्हय़ातील ग्रंथालयांना उतरती कळा

Amit Kulkarni

अर्जुनवीर साई सोशल, साई स्पोर्टस् हुबळी टायगर्स संघांचे विजय

Amit Kulkarni

कुडची-रायबाग रेल्वे दुपदरीकरण कामाची पाहणी

Amit Kulkarni

वैद्यकीय कचरा टाकला भरवस्तीत

Amit Kulkarni

आर्ट्स सर्कलतर्फे आज रुचिरा यांचे गायन

Amit Kulkarni

शेतकऱयांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे

Patil_p