बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटना व चेकमेट स्कूल ऑफ चेस आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा कम निवड चाचणीत डीपी स्कूलच्या विवंता पाटील हिची 7 वर्षाखालील गटात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बेळगाव येथे घेण्यात आलेल्या स्पर्धा कम निवड चाचणीत विवंता पाटील हिने आपल्या गटात प्रथम स्थान मिळविले. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तिची निवड बेळगाव जिल्हा संघात करण्यात आली आहे. तिला बुद्धिबळ प्रशिक्षक अजय धामणेकर, क्रीडा शिक्षिका मोनिका लोबो यांचे मार्गदर्शन तर डीपी स्कूलच्या प्राचार्या सिस्टर रोजम्मा जोसेफ यांचे प्रोत्साहन लाभत आहे.