Tarun Bharat

स्व. भाऊ साहेब बांदोडकरांचे नाव मोपाला न दिल्यास आता लावण्यात येणारा नामफलक उतरविणार

मोपा नामकरण समितीचा पत्रकार परिषदेत म्हापशात सरकारला इशारा ; म्हापशात मंत्री सुदीन ढवळीकरांच्या पुतळय़ाचे निषेध करीत दहन

प्रतिनिधी /म्हापसा

विमानतळ नामकरणाबाबत केंद्र सरकारने काय निर्णय घेतला तो आम्हाला पडलेला नाही. ज्या माणसाने म्हादई पात्रात कित्येक पॅसिनो आणले, म्हादईचा गळा घोटला, स्व. भूसाहेबाने कायदा केलेला कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर तो बदलून भाटकारशाही कायदा केला. ज्यांनी राफाईल घोटाळा केला भाषेची विटंबना केली अशा मआमसाला सरकार पुढे काढून त्याचे नाव ठेवू पाहतो काय? हे मंत्री सुदीन ढवळीकरांनी स्पष्ट कारवे.

ढवळीकरांनी स्वतःच्या फायद्यासाठी मगो पक्ष विकलाच आणि आपणही विकले गेले. आम्ही छोटय़ा समाजाचे लोक कधी विकले जाणार नाही. जोपर्यंत स्व. भाऊसाहेबांचे नाव मोपा विमानतळाला देत नाही वा येत नाही तर आम्ही मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती तीव्र भूमिका घेणार ती राज्यभर पेटणार आणि जो फलक भाऊशिवाय मोपा विमानतळावर घालणार तो उतरावा लागेल आणि स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचाच नामफलक मोपा विमानतळाला द्यावा लागेल असा इशारा म्हापसा येथे मारुती मंदिरासमोर असलेल्या स्व. भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुतळय़ासमोर आयोजित पत्रकार परिषदेत या समितीच्या पदाधिकाऱयांनी बोलताना दिला. विशेष म्हणजे विमानतळ नामकरणाबाबत केंद्राचा निर्णय मान्य म्हणणाऱया मगो नेते तथा वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या पुतळय़ाचे म्हापशात दहन करण्यात आले.

सुदीन ढवळीकरांनी केंद्राचा निर्णय मान्य असल्याचे विचार मागे घ्यावे- सुभाष केरकर

मुख्यमंत्र्यांनी केंद्र समितीचा ठराव घेऊन केंद्रीय मंत्री, फडणवीस मुख्यमंत्री सर्वांना पत्र लिहिले आहे. मोपाला भाऊसाहेबांचे नाव द्यावे म्हणून हा ठराव कसा आणि का घेतला. आज सुदीन ढवळीकर म्हमतात आपल्यास पर्रीकरांच्या नावाची मान्यता आहे तर यापूर्वी हा ठराव कसा काय घेतला. ढवळीकर दुटप्पी असून ते दोन तोंडाने बोलत आहे. अशा मंत्र्याला जनतेने जवळ करू नये. भाऊच्या नावे ढवळीकरांनी साम्राज्य उभे केले आणि ते फक्त भाजपचे गोडवे गातात असे असल्यास त्यांनी भाजपात जाऊन विजयी व्हावे आणि हा पक्ष सोडावा. आम्ही त्यांना आव्हान करतो त्यांनी मडकईतून जिंकून दाखवावे. भाऊचे नाव पुढे न्यायला पाहिजे ते ढवळीकर मागे करीत आहे. आम्ही त्यांच्या या वृत्तीचा निषेध करतो. त्यांनी आपले पर्रीकरांच्या नावाचे विचार मागे घ्यावेत अशी मागणी यावेळी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे निमंत्रक सुभाष केरकर यांनी केली.

मोपाला नाव द्या म्हटले म्हणून आम्ही विघ्न संतोषी?- संजय बर्डे

संजय बर्डे म्हणाले की, ढवळीकर दोन्ही बाजूनी बोलत आहे. त्यांचे बंधूनी मगोचे अध्यक्ष आहेत त्यांनी आजपर्यंत सांगितले नाही भाऊचे नाव दिल्लीला पाठविले आहे की नाही. भाजपच्या अध्यक्षाचे म्हणणे आहे रिजनल पक्ष आम्ही संपवून टाकणार. आज आम्ही भाऊंचे नाव पुढे घेऊन चाललो आहेत तर आम्ही विघ्न संतोषी काय? त्यांनी स्वतः विचार करायला पाहिजे राज्यात मगो संपविण्यास सुदीन ढवळीकर कारणीभूत आहे. ढवळीकरने मडकई मतदारसंघात आपण मगोत नाही म्हणून स्पष्ट करावे. बहूजन समाजाचा पक्ष ढवळीकरांनी संपविला आहे असा आरोप बर्डे यांनी केला.

सुदीन ढवळीकर व जीत आरोलकरांनी सत्ता भोगण्यासाठी गप्प बसले- जितेश कामत

शिवसेना गोवा राज्य प्रमुख म्हणाले, आम्ही भाऊचे नाव मोपाला द्यावे म्हणून कित्येक दिवसापासून प्रयत्न करीत आहे. यापूर्वी बॅनर करून आम्ही यासाठी तेथे उभे राहिलो आहे. ढवळीकरांच्या विधानाचा आम्ही निषेध करीत आहोत. मगो वाले आम्हाला भाऊचे नाव मान्य आहे आणि केंद्र सरकार निर्णय घेतो तोही मान्य आहे असे म्हणत आहे. दोन्ही बाजूनी ते बोलत आहे. भाऊच्या नावे ढवळीकर विजयी होत आहे व दुसरीकडे आर्लेकरही मगोवरती निवडून येत आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली.

मडकई वासियांनी ढवळीकरांना बळी पडू नये- दिपेश नाईक

दिपेश नाईक म्हणाले, ज्या सरकाराने राज्यात पॅसिनो आणले, कसेल त्याची जमीन राहीज्त्याचे घर यात बदल केला, ज्या माणसाने राफायल घोटाळा केला, भाषेची विटंबणा केली अशा माणसांना तुम्ही पुढे करतात. आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळाला काय प्रतिमा देणार? आम्ही मोपा विमानतळासाठी जो पर्यंत भाऊचे नाव घालत नाही तोपर्यंत भांडत राहणार. छोटय़ा समाजाला संपवून टाकले. ढवळीकरांच्या पैशाना मडकई वासियांनी बळी पडून लाचार होऊ नये असे ते म्हणाले.

तर ढवळीकरांना आम्ही येऊ देणार नाही- समीप परवार

शेडय़ूल कास्ट पॉलिटीकल फ्रन्टचे अध्यक्ष समीप परवार म्हणाले, भाजप व मगोनी जी पाऊले उचलली आहे ती आजची अस्मिताय संपविणारी आहे. भाऊवर आज त्यांनी आड आणली आहे. ढवळीकर आमच्या मागास वर्गाच्या वाडय़वार कुठेही प्रचारासाठी जाईल तर आम्ही त्यांना हाकलून लावणार असे समीप परवार यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्रीही डॉ. प्रमोद सावंत आमच्या मागास वर्गीयांच्या प्रचारासाठी आल्यास आम्ही त्यांना हाकलून लावणार असल्याची माहिती यावेळी परवार यांनी दिली.

Related Stories

इमारतीची चाललेली दुरुस्ती बेकायदा असल्याचा दावा

Amit Kulkarni

नितीन गडकरी यांची शनिवारी ऑनलाईन सभा

Omkar B

अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मुरगावच्या उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले यांचा राजीनामा

Amit Kulkarni

शहांचे वक्तव्य दोन मंत्र्यांनाही अमान्य

Amit Kulkarni

पितृपक्षातच सीमोल्लंघन!

Amit Kulkarni

रियाजात गुंतले कलाकार…

Omkar B