किल्ला तलाव परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाचा उपक्रम : प्लास्टिकचे विघटन करण्याची शासनाकडून सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
प्लास्टिकचा वापर टाळण्यासह पुनर्वापर करण्यात येणाऱया वस्तूंचा उपयोग करण्यात यावा, याकरिता महापालिकेच्यावतीने टायकॅथॉन उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने किल्ला तलाव परिसरात ‘आय लव्ह बेलगाम’ असा उल्लेख असलेला सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे.
महापालिकेच्यावतीने शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निर्माण होणाऱया कचऱयाची विल्हेवाट स्थानिक पातळीवर लावण्यासाठी प्लास्टिकचे विघटन करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली आहे. त्याकरिता विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पुनर्वापर करण्यात येणाऱया वस्तूंपासून खेळणी तसेच अन्य वस्तू निर्माण करण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्यावतीने टायकॅथॉन मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांच्या सूचनेनुसार किल्ला तलाव परिसरात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे.
शहरात प्लास्टिक पिशव्यांसह बाटल्यांचा वापरही मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. कचऱयामध्ये टाकण्यात आलेल्या विविध प्रकारच्या बाटल्यांच्या माध्यमातून किल्ला तलाव परिसरात ‘आय लव्ह बेलगाम’ असा उल्लेख असलेला सेल्फी पॉईंट तयार केला. याची पाहणी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ आणि पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांनी केली.
हा उपक्रम राबविण्यासाठी स्वच्छता निरीक्षक रुकसार मुल्ला, पुंडलिक राठोड, संतोष कुरबेट आदींसह सुपरवायझर आर. अशोक व मनपाच्या इतर कर्मचाऱयांनी परिश्रम घेतले.