Tarun Bharat

सेमीकंडक्टर पुरवठा सुधारला- वाहनांची विक्री वाढली

Advertisements

जुलैमध्ये प्रवासी वाहन विक्रीत 11 टक्के तेजी ःसियामच्या आकडेवारीतून माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील काही महिन्यांपासून सेमीकंडक्टर पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र त्यामध्ये आता सुधारणा होत असल्याचा फायदा वाहन कंपन्यांना होत आहे. यामुळेच कंपन्या सणापूर्वी उत्पादन वाढवू शकल्या आहेत. दुसरीकडे जुलैमध्ये प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वार्षिक 11 टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती वाहन उत्पादक संघटनेच्या ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) ने जारी केलेल्या आकडेवारीतून देण्यात आली आहे.

आकडेवारीनुसार, संपूर्ण प्रवासी वाहन वर्गातील घाऊक विक्री जुलै, 2022 मध्ये 2,93,865 युनिट्सपर्यंत वाढली. जुलै, 2021 मध्ये, डीलर्सना 2,64,442 युनिट्सचा पुरवठा करण्यात आला. जुलैमध्ये पॅसेंजर कारचा पुरवठा 10 टक्क्यांनी वाढून 1,43,522 युनिट्सवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 1,30,080 युनिट होता.

युटिलिटी वाहनांची घाऊक विक्री जुलै 2022 मध्ये 1,24,057 युनिट्सच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढून 1,37,104 युनिट झाली आहे. व्हॅनचा पुरवठा जुलै 2021 मध्ये 10,305 युनिट्सवरून यावर्षी जुलैमध्ये 13,239 युनिटपर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे घाऊक व्यापाऱयांना दुचाकींचा पुरवठा गेल्या महिन्यात 10 टक्क्यांनी वाढून 13,81,303 युनिट्सवर पोहोचला आहे.

बाजारपेठ पूर्णपणे सावरलेली नाही ः मेनन

सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले की, प्रवासी कार, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची बाजारपेठ अद्याप पूर्णपणे सावरलेली नाही. ‘जुलै 2022 मध्ये दुचाकींची विक्री जुलै 2016 पेक्षा अजूनही कमीच आहे,’ असे मेनन यांनी सांगितले आहे.

Related Stories

आम्हीही शंख वाजवला, आता सरकारचा घंटा वाजणार : राकेश टिकैत

Abhijeet Shinde

अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचे आज आंदोलन

Patil_p

देशात 37,975 नवे कोरोना रुग्ण, 480 मृत्यू

datta jadhav

टेक्सटाईल, फुटवेअरवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय तुर्तास स्थगित

datta jadhav

आजपासून राजस्थानमध्ये लॉकडाऊनबाबत नवीन नियमावली

Rohan_P

एकाचवेळी 50 ऑम्लेट खाणारा खादाड

Patil_p
error: Content is protected !!