Tarun Bharat

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठीच्या ठरावाबाबत चराठा येथे चर्चासत्र

Advertisements

ओटवणे /प्रतिनिधी-

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त कृषी तांत्रिक अधिकारी कर्मचारी संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चराठा ग्रामपंचायत सभागृहात मार्गदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. वन्य प्राणी व पशुपक्षामुळे होणाऱ्या शेती बागायती योग्य नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय होण्यासाठी येत्या १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत घ्यावयाच्या ठरावाबाबत या चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  

अशा चर्चासत्राद्वारे जिल्हा सरपंच सेवा संघाने यापूर्वी जिल्ह्यातील सीआरझेड तसेच इको सेन्सिटिव्ह झोनबाबत शासन दरबारी आवाज उठवून त्यात यश मिळविले आहे. त्याचप्रमाणे वन्यजीव संरक्षण अधिनियमातील तरतुदीप्रमाणे शासन स्तरावर आवश्यक ते बदल होण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव पारित करून हा ठराव शिफारशीसह ऊचित कार्यवाहीसाठी विहित मार्गाने शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे. यासाठीच या  ग्रामसभेच्या ठरावासाठी चर्चासत्र व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मिलिंद पाटील आणि सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी जनार्दन फाले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

Related Stories

तुटलेल्या विजतारेच्या शॉकने पती-पत्नीचा मृत्यू

Patil_p

कोकणवासियांसाठी गोकुळचे ताजे दूध

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे संमती पत्र लागणार

Patil_p

साटेली भेडशीतील दूरसंचार सेवा होणार सुरळीत

NIKHIL_N

आरोग्य केंद्रासह अकरा नवीन उपकेंद्रे

NIKHIL_N

रत्नागिरी : कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर प्रणाली कार्यान्वित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!