प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील मराठी टीचर्स टेनिंग (डी. एड्) कॉलेजमध्ये ‘बालमानस शास्त्र आणि शिक्षकाचे तणावमुक्त आणि प्रभावी अध्यापन कार्य’ या विषयावर परिसंवाद कार्यक्रम नुकताच पार पडला. व्याख्याते म्हणून तेजस कोळेकर तर प्राचार्य एम. बी. हुंदरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुऊवात झाली. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. व्ही. पी. महाजन यांनी करून दिली. यानंतर तेजस कोळेकर यांचे एम. बी. हुंदरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी तेजस कोळेकर म्हणाले, पूर्वीची शिक्षण पद्धती ही गुरुकुल पद्धतीची होती. यामध्ये ऋषी-मुनींच्या आश्रमात राहून विद्या मिळवावी लागत होती. आता विद्यार्थी केंद्रीत पद्धती आहे. शासनाने बऱ्याचशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरीसुद्धा अधिक ताणतणावाचे जीवन जगावे लागत आहे. या तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी वेगवेगळे खेळ, कृती, उपक्रम आपण शाळेमध्ये राबविले पाहिजेत, मुलांना तणावमुक्त जीवन जगण्याची संधी तुम्ही भावी शिक्षक या नात्याने प्राप्त करून दिली पाहिजे.
कार्यक्रमाला कॉलेज स्टॉफ, डी. एड् प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. पी. एम. सुभेदार यांनी आभार मानले.