ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेच्या माजी गटनेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत गुजरात गाठले, त्यानंतर ते रात्रीत गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदेंच्या गटातून कैलास पाटील यांच्यानंतर आणखी एक आमदार निसटला आहे. मी उद्धव ठाकरेंचाच म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर्फ ४६ आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. परंतु आताच एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या गटात कालपर्यंत असलेले नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आज नागपूरमध्ये परतले आहेत. नागपूरमध्ये येताच त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. पोलिसांनी मला रुग्णालयात नेलं आणि मला हार्टअटॅक आल्याचा बनाव रचला. अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा : काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडीसोबत – बाळासाहेब थोरात
”मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझी तब्येत चांगली आहे. मला गुजरात पोलिसांनी जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेले आणि म्हणाले तुमच्यावर कारवाई करायची आहे. परंतु तेव्हा माझी तब्येत ठीक होती. मला हृदयविकाराचा झटका आला ही बातमी खोटी होती. वीस-पंचवीस लोकांनी मला जबरदस्ती इंजेक्शन दिले. मला माहिती नव्हतं माझ्या शरीरावर चुकीच्या प्रक्रिया करण्याचं त्या लोकांच षडयंत्र होतं” असा धक्कादायक आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान, काल उस्मानाबादच्या कळंबचे आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदेंच्या गटातून पळून आल्याचे त्यांनी सांगितले होते. शिंदेंनी त्यांना कशापद्धतीने गुजरातच्या सिमेपर्यंत नेले याचा संपुर्ण कथानक त्यांनी सेना प्रमुखांना सांगितला.