उदय सावंत/पाली सत्तरी
गेल्या 65 वर्षापासून सत्तरी तालुक्मयातील पाल येथील 87 वषीय बुधाजी गावकर हा गणेश मूर्तीच्या कलेमध्ये आनंद शोधताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षापासून तो ही कला जपत आहे. गेल्या काही वर्षापासून वाढणारी महागाई व मनुष्यबळाची कमतरता यामुळे सध्या गणेश मुर्ती शाळा चालविणे अत्यंत जोखमीचे काम ठरू लागले आहे. यामुळे सातत्याने गणेश मूर्तीच्या दरामध्ये वाढ करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. तरीसुद्धा बुद्धीची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱया गणेशाची मूर्ती साकार करून ती गणेश भक्ताकडे पाठविताना वेगवेगळय़ा प्रकारचे समाधान वाटत असते अशी प्रतिक्रिया बुधाजी गावकर यांनी व्यक्त केली आहे.
सध्या बुधाजी गावकर यांचे वय 87 वर्षे आहे. पंधरा वर्षांपासून ते या कलेमध्ये रमत आहेत .सुरुवातीला एक गंमत म्हणून त्याचे हात मातीमध्ये रुतले. आज या कलाकाराने 87 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे व पाच वर्षापासून ते सातत्याने गणेश मूर्ती तयार करण्याची कला जपताना दिसत आहे.
एकूण प्राप्त माहितीनुसार सध्या ते 250 पेक्षा जास्त मुर्त्या घडविताना दिसत आहेत. यामध्ये वेगवेगळय़ा मुर्त्यांना सुबक असा आकार देऊन सुंदर रंग देण्याची प्रक्रिया यासाठी त्यांची विशेष ओळख आहे. गणेश मूर्ती साकारण्याचा गाडा अभ्यास असल्यामुळे वेगवेगळय़ा प्रकारच्या मुर्त्या गणेश भक्तांना कशाप्रकारे आवडू शकतात यावर ध्यान देऊन ते या शाळेला एक वेगळय़ा प्रकारची प्रतिमा निर्माण करून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत.सध्या त्याचे कुटुंबीय यागणेश मूर्ती शाळेमध्ये पूर्णपणे रमल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की सध्या माझे वय 87 वर्षे आहे .मी स्वतः सुरू केलेल्या या शाळेत हाच 250 पेक्षा जास्त गणेश मुर्त्या तयार होताना दिसत आहे. आज माझ्या कुटुंबातील प्रत्येक घटक या शाळेसाठी विशेष योगदान देताना दिसत आहे. गणेश भक्तांचे समाधान हाच एकमेव उद्देश डोळय़ासमोर ठेवून ही शाळा चालविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महागाई वाढू लागली आहे. यामुळे रंगांची किंमत झपाटय़ाने वाढू लागली आहे .मुर्ती घडविण्यासाठी पेडणे भागातून माती आणावी लागत आहे .सुरुवातीला ही माती कमी किमतीमध्ये उपलब्ध होत होती .सध्या एक ट्रकामागे सात हजार मोजावे लागत आहे .अशा अवस्थेत गणेश मुर्त्या तयार करून त्या गणेशभक्तां पर्यंत वाजवी दरात कशा काय पाठवाव्यात यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा गावाबरोबरच गोव्याच्या अनेक गावातही त्यांच्या मूर्ती मोठय़ा प्रमाणात मागणी असते. काही मुर्त्या महाराष्ट्रातील गोवा सीमेवर असलेल्या गावात नेण्यात येत असतात.
दिवस रात्र करून या मुर्त्या घडविण्याचे कार्य ह्या कुटुंबियाकडून होत आहे. ही कलेची सेवा करण्याचे कार्य म्हणजे गणेशाची अनेक प्रकारे सेवा असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.