वेंगुर्ले (वार्ताहर)-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापनदिनाचा निमित्ताने वेंगुर्ले येथे जेष्ठ नागरीक सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दि. 20 जुन रोजी सकाळी 10.30 वाजता साईमंगल कार्यालय, सुंदरभाटले वेंगुर्ले येथे जेष्ठ नागरीकांना सन्मानीत करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा तथा कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमांस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेंगुर्ले तालुक्यातील विविध फ्रंटच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळीच उपस्थित रहावे. असे आवाहन प्रभारी तालुकाध्यक्ष मकरंद परब यांनी केले आहे.