विलास घाडी यांना विजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक सरकारतर्फे महिला आणि ज्येष्ट नागरिक खात्यामार्फत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा एस. जी. बाळेकुंद्री इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जलद चालणे या प्रकारात वय वर्षे 60-70, 70-80 व 80 वरील गट तीन असे गट करण्यात आले होते. यामध्ये विलास घाडी यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत 14 तालुक्मयातील 200 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. 60 ते 70 या गटात विलास घाडीनी भाग घेतला होता व तिन्ही फेऱयामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. डिसेंबर महिन्यात बेंगळूर येथे होणाऱया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विलास घाडी निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत.