ऑनलाईन टीम/तरुण भारत
अनेक मराठी चित्रपटात विविध भूमीका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण (prema kiran marathi actress) यांचं हृदयविकाराच्या (heart attack) झटक्याने निधन झालं. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. उतावळा नवरा, थरकाप, धूमधडाका, दे दणादण, अर्धांगी,गडबड घोटाळा, माहेरचा आहेर, सौभाग्यवती सरपंच अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. (senior marathi actress Prema Kiran Passes Away)
प्रेमा किरण यांनी ८०,९० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
दरम्यान, प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नव्या कलाकारांना मालिकांचे पैसे तीन महिन्यांपर्यंत मिळत नाहीत. तसंच पडद्यामागील कलाकारांनाही कोणी वाली नाही. त्यांच्यासाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरविल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं.