Tarun Bharat

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

Dr. Nagnath Kottapalle passed away ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. मागील दोन दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 या दिवशी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला होता. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे त्यांनी पूर्ण केले होते. त्यामध्ये ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात प्रथम आले होते. त्यांनी 1980 मध्ये औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठातून डॉ. यु. म. पठाण यांच्या मार्गदर्शनाने ‘शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएचडी केली होती. कोतापल्ले 1977 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी यशस्वी कारकीर्द पार पाडली होती. 2005 ते 2010 पर्यंत त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले होते.

अधिक वाचा : भाजप मंत्र्याकडून शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्य्रातील सुटकेशी तुलना!

साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती त्यांनी केली. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. श्रीगोंदा येथे 1999 साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि 2005 साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण येथे 2012 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचेही ते अध्यक्ष होते.

Related Stories

ग्राहकांना वारंवार विनंती करीत राहणार

Amit Kulkarni

अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त होणार

Patil_p

अत्यावश्यक सेवांनाही मिळेना पेट्रोल

Archana Banage

भास्कर जाधव यांच्या ‘त्या’ कृतीवर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

Archana Banage

बेपत्ता झालेल्या ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींचा शोध लागला

datta jadhav

महाराष्ट्र : महिलांवरील अत्याचारांविरोधात ‘शक्ती कायदा’

Tousif Mujawar