क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन, आबा स्पोर्ट्स क्लब व क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. रामचंद्र (तात्या) पवार पहिल्या मास्टर्स जलतरण स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
रोटरी मनपा जलतरण तलावात आयोजित जायंट्स सप्ताहानिमित्त 30 ते 40, 41 ते 50, 51 ते 60 व 61 वर्षावरील अशा विविध वयोगटात स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सचिव मुकुंद महागावकर, मोहन कारेकर, शिवराज पाटील, अनंत लाड, दिगंबर किल्लेकर, ऍड. मोहन सप्रे, विश्वास पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जायंट्सचे पदाधिकारी राहुल बेलवलकर, अरुण काळे, अशोक हलगेकर, विजय बनसुर, विजय भोसले, अजित कोंकणे, पी. एल. पावशे, मोहन पत्तार, प्रसाद हुली व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
गट एक 61 वर्षावरील ः 50 मीटर फ्रीस्टाईल- महादेव पाटील प्रथम, एस. बी. खणगणी द्वितीय, परशुराम नाईक तृतीय, 50 मीटर बॅकस्ट्रोक व ब्रेस्टस्ट्रोक-महादेव पाटील प्रथम, एस बी खणगणी द्वितीय, मोहन सप्रे तृतीय. गट दोन 51 ते 60 वर्षे वयोगट ः 50 मीटर फ्रीस्टाईल व बॅकस्ट्रोक कल्लाप्पा पाटील प्रथम, सतीश पाटील द्वितीय, आदिराज सुपनावर तृतीय. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक-1. सतीश पाटील 2. आदिराज सुपनावर 3. कल्लाप्पा पाटील.
गट तीन 41 ते 50 वयोग
50 मीटर फ्रीस्टाईल-1. पद्मप्रसाद हुली, 2. शाम मलाई 3. संदीप मलाई, 50 मीटर बॅकस्ट्रोक-1. श्याम मलाई 2. संदीप मलाई 3. अजय आचार्य. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक-1. श्याम मलाई 2. संदीप मलाई 3. अरुण जाधव.
गट चार 30 ते 40 वयोगट ः 50 मीटर फ्रीस्टाईल-1. शिवराज मोहिते 2. विजय भोगण 3. कौस्तुभ पोटे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मारुती घाडी, संदीप मोहिते, शुभांगी मंगळूरकर, शिवराज मोहिते, रणजीत पाटील, भरत पाटील, किशोर पाटील, विजय नाईक, विजय बोगन व आबा क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पदके व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.