निफ्टीही वधारली : माहिती तंत्रज्ञान, बँकिंग यांची मजबुती
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात गुरुवारच्या दिवशी प्रमुख क्षेत्रांपैकी माहिती तंत्रज्ञान, बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राच्या समभागात जोरदार लिलाव झाला. विदेशी निधीच्या प्रवाहाच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 515 अंकांनी वधारला आहे. यामुळे बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स घसरणीत राहिला असला तरी गुरुवारी मात्र सावरल्याचे दिसून आले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 515.31 अंकांनी वधारुन निर्देशांक 59,332.60 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 124.25 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 17,659.00 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्समधील ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक 2.75 टक्क्यांनी वधारले असून अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, एचडीएफसी, टेक महिंद्रा, विप्रो, स्टेट बँक, टीसीएस आणि इंडसइंड बँक यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, मारुती सुझुकी आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
जागतिक पातळीवरील अन्य बाजारांमधील हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे लाभात राहिले. तर जपानचा निक्की नुकसानीसह बंद झाला. जागतिक बाजारातील तेजीचा कल आणि अमेरिकेपाठोपाठ आशियातील बाजारात मजबूत स्थिती राहिल्याचा फायदा गुरुवारी भारतीय बाजाराला झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
याच दरम्यान विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात निव्वळ 1,061.88 कोटी रुपये किमतीच्या समभागांची खरेदी केली आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.92 टक्क्यांच्या वृद्धीसोबत 98.30 डॉलर प्रति बॅरेलवर राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- ऍक्सिस बँक 758
- बजाज फायनान्स. 7318
- एचडीएफसी……. 2454
- टेक महिंद्रा………. 1077
- टीसीएस………… 3422
- एसबीआय………. 524
- विप्रो…………….. 438
- टायटन………….. 2472
- इंडसइंड बँक……. 1079
- कोटक महिंद्रा…… 1853
- एचडीएफसी बँक. 1485
- आयसीआयसीआय………. 859
- इन्फोसिस……….. 1619
- एचसीएल टेक….. 962
- आयशर मोटर्स….. 3176
- लार्सन टुब्रो……… 1867
- बजाज फिनसर्व्ह.. 15737
- जेएसडब्ल्यू स्टील. 673
- श्री सिमेंटस……… 21192
- डॉ. रेड्डीज लॅब्ज… 4258
- हिरो मोटो कॉर्प… 2785
- रिलायन्स……….. 2591
- युपीएल………….. 767
- अदानी पोर्टस्…… 792
- टाटा मोटर्स…….. 476
- सन फार्मा……….. 921
- एचडीएफसी लाईफ 541
- बीपीसीएल……… 328
- अल्ट्राटेक सिमेंट… 6597
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अपोलो हॉस्पिटल 4429
- आयटीसी……….. 306
- हिंडाल्को………… 431
- एनटीपीसी……… 153
- एचयुएल………… 2613
- एसबीआय इन्शु… 1261
- भारती एअरटेल… 709
- ओएनजीसी……… 132
- मारुती सुझुकी….. 8813
- ग्रेसीम……………. 1600
- कोल इंडिया…….. 218
- नेस्ले……………… 19679
- पॉवरग्रीड कॉर्प…. 222
- ब्रिटानिया………. 3640
- एशियन पेंटस 3405