Tarun Bharat

सेन्सेक्सची 1,277 अंकांची उसळी

Advertisements

तेजीसोबत सेन्सेक्स 58 हजारांवर ः जागतिक संकेताचा परिणाम

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात मंगळवारच्या सत्रात मजबूत तेजीची स्थिती राहिली होती. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 1,277 अंकांनी वधारला आहे. जागतिक पातळीवरील सकारात्मक कल शेअर बाजाराला तेजी राखण्यासाठी सहाय्यक ठरला.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी शेअर बाजारात दिवसअखेर सेन्सेक्स 1,276.66 अंकांसोबत 2.25 टक्क्यांच्या मजबूतीसह निर्देशांक 58,065.47 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 3386.95 अंकांसह 17,274.30 वर स्थिरावला आहे. काहीवेळ सेन्सेक्स 1,311.13 अंकांपर्यंत वाढला होता.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, टाटा स्टील, लार्सन ऍण्ड टुब्रो, विप्रो, एचडीएफसी बँक आणि ऍक्सिस बँक यांचे प्रमुख समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, सनफार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.

सप्ताहाच्या प्रारंभी सोमवारच्या सत्रात घसरणीचा कल राहिला होता, यामध्ये सेन्सेक्समध्ये 638.11 अंकांची घसरण राहिली होती, तर निफ्टीही 207 अंकांनी प्रभावीत झाला होता. 

जागतिक बाजारांपैकी आशियातील दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्की लाभात राहिला आहे. तर अमेरिकन बाजारात तेजी आल्यानंतर आशियातील बाजारात मजबूत स्थिती राहिली होती. कारण फेडरल रिझर्व्ह आक्रमकपणे व्याजदरात करणाऱया वृद्धीवर पूर्ण विराम लावणार असल्याचे संकेतही यावेळी व्यक्त केले जात आहेत. सदरच्या स्थितीचाही परिणाम हा भारतीय बाजारावर सकारात्मक राहिला. युरोपच्या प्रमुख बाजारामध्ये तेजीचा कल राहिला होता. अमेरिकन बाजार सोमवारी तेजीत राहिला आहे. कच्चे तेल 0.78 टक्क्यांनी वधारुन 89.55 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

Related Stories

सप्ताहातील अंतिम सत्र घसरणीसह बंद

Patil_p

झोमॅटोचा महसूल दुप्पट वाढला

Patil_p

एलआयसीच्या समभागात सततची घसरण

Patil_p

जूनमध्ये इंधनाची 16.29 दशलक्ष टन विक्री

Patil_p

इलेक्ट्रिक स्कूटर बनविणार रोबोट

Patil_p

अदानींची 29 हजार कोटींच्या आयपीओसाठी मोठी योजना

Amit Kulkarni
error: Content is protected !!