Tarun Bharat

सेन्सेक्स घसरणीत, निफ्टीत तेजीची झुळूक

Advertisements

चढउताराचा बाजारात प्रवास : आयटी व रियल्टीमध्ये नफावसुली

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मोहरमच्या सुट्टीनंतर आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी भारतीय शेअर बाजारात चढउतारचे वातावरण राहिल्याचे दिसून आले. सेन्सेक्समध्ये घसरण तर निफ्टीत मात्र तेजी बुधवारी पाहायला मिळाली.

यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीसोबत आयटी व रियल्टी या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात  नफावसुली राहिली होती. या गोष्टीचा नकारात्मक परिणाम झाल्याने धातू व तेल व गॅस या क्षेत्रातील कंपन्यांना मात्र नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्स दिवसअखेर 35.78 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 58,817.29 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 9.65 टक्क्यांनी वधारुन 17,534.75 वर बंद झाला आहे. बुधवारी शेअर बाजारात जागतिक पातळीवरील स्तर हा नकारात्मक राहिल्याच्या कारणास्तव गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक एका ठराविक मर्यादेपर्यंत निश्चित करुन ठेवल्याचे पहावयास मिळाले.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचे सर्वाधिक 2.66 टक्क्यांचे नुकसान झाले, तर एनटीपीसी, एचसीएल टेक, विप्रो, एशियन पेन्ट्स. अल्ट्राटेक सिमेंट आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले होते. दुसऱया बाजूला टाटा स्टील, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि इंडसइंड बँक यांचे समभाग मात्र लाभात राहिले आहेत. निफ्टी आयटी निर्देशांक 0.9 टक्के इतका घसरला होता तर धातू निर्देशांक 1.6 टक्के मजबुत दिसला होता.

आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी यांची कामगिरीही नुकसानीत राहिली होती. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.05 टक्क्यांच्या घसरणीसोबत 95.30 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

Related Stories

तिमाहीत ‘शाओमी’ भारतीय स्मार्टफोन बाजारात आघाडीवर

Patil_p

किरकोळ वाढीसह दोन्ही निर्देशांक बंद

Amit Kulkarni

मारुती सुझुकीची नवी इर्टिगा लवकरच होणार लाँच

Patil_p

रिलायन्ससोबतचा एअरटेलचा करार पूर्ण

Patil_p

सेबीची दोन कंपन्यांना आयपीओसाठी मंजुरी

Patil_p

‘टाटा’च्या दोन समभागांनी दिला मजबूत परतावा

Patil_p
error: Content is protected !!