निफ्टीही घसरणीसह बंद : आर्थिक व आयटीचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी पुन्हा घसरणीचे सत्र राहिल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स नफा वसुलीच्या प्रभावामुळे 537 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर आर्थिक व आयटी क्षेत्रातील समभागांमधील नफा वसुलीने बाजार नुकसानीत राहिल्याचे दिसून आले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 537.22 अंकांनी घसरुन निर्देशांक 56,819.39 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 162.40 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,038.40 वर बंद झाला आहे. बुधवारी ट्रेडिंग दरम्यान काही काळ सेन्सेक्स 772.57 अंकांनी घसरला होता.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, टायटन, डॉ. रेड्डीज लॅब, विप्रो, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, मारुती सुझुकी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे प्रमुख समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला टाटा स्टील, एशियन पेन्ट्स, एचसीएल टेक, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत. जागतिक बाजारात आशियासह अन्य बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिला होता. यामध्ये जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे एक टक्क्यांनी नुकसानीत राहिला होता. तर हाँगकाँगचा हँगसेंग तसेच चीनचा शांघाय कम्पोझिट तेजी राखून होता. युरोपातील मुख्य बाजारात दुपारपर्यंत तेजीचा कल राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय कच्चे तेल 0.89 टक्क्यांनी वाढून 105.81 डॉलर प्रति बॅरेलवर बंद झाले आहे. तर विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी 1,174.05 कोटी मूल्याचे समभाग विक्री केले आहेत.