2022 मधील सर्वात मोठी दुसरी तेजी ः निफ्टीही 430 अंकांसह मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व निफ्टी यांच्या कामगिरीने शेअर बाजारात उत्साहाची मजबूत स्थिती राहिली होती. यामध्ये वर्ष 2022 च्या प्रवासातील ही सर्वात मोठी तेजी राहिली असल्याची माहिती आहे. बँकिंग, आयटी आणि तेल कंपन्यांच्या समभागातील लिलावामुळे शेअर बाजाराने ही मजबूत स्थिती प्राप्त केली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 1564.45 अंकांनी वधारुन 2.70 टक्क्यांच्या तेजीसह निर्देशांक 59,537.07 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 446.40 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 17,759.30 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये मंगळवारी बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले असून यासोबतच बजाज फायनान्सचे समभाग हे 4.86 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील आणि एचडीएफसी यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील वातावरणामध्ये आशियातील अन्य बाजारांपैकी दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की लाभात तर हाँगकाँगचा हँगसेंग आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे नुकसानीसह बंद झाले आहेत. युरोपमधील प्रमुख बाजारांची सुरुवात ही मजबूत राहिली होती.
जागतिक घडामोडींचा प्रभाव
शेअर बाजारात सकारात्मक स्थिती राहिल्यामुळे व जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताचा योग्य प्रवास सुरु असल्याने भारतीय बाजारात उच्चांकी स्थिती प्राप्त झाली आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांच्या समर्थनामुळे स्थानिक समभाग तेजीत राहिले असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 2.60 टक्क्यांनी घसरुन 102.52 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहेत.