Tarun Bharat

शेअरबाजारात सेन्सेक्स, निफ्टी तेजीसह बंद

सेन्सेक्स 213 अंकांच्या वधारासह बंद, टाटा स्टीलचा समभाग चमकला

वृत्तसंस्था /मुंबई

जागतिक सकारात्मक संकेतामुळे शेअर बाजार गुरुवारी तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला. धातू, बँकिंग क्षेत्राच्या निर्देशांकाने बाजाराला आधार दिला.

सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 213 अंकांच्या वधारासह 59,756 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 80 अंकांच्या वाढीसह 17,736 अंकांवर बंद झाला. टाटा स्टील, पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक वधारले होते.

जागतिक मिळत्याजुळत्या संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार गुरुवारी तेजीसह वाटचाल करत होता. 30 समभागांच्या सेन्सेक्स निर्देंशांकाने दुपारच्या सत्रात 300 अंकांची तेजी कमावली होती. शेअर बाजारात गुरुवारच्या सत्रात समभागांच्या खरेदीवर अधिक जोर दिसून आला. सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकही तेजीमध्ये होता. आयटी निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक तेजीत होते. धातू निर्देशांक दिडटक्के मजबूत होता तर बँका आणि वित्तसंस्थांचा निर्देशांकदेखील अर्धा टक्का इतका तेजीत होता. सोबत रियल्टी निर्देशांक, ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांकदेखील तेजीसह व्यवहार करीत होते. सेन्सेक्स एकावेळी 321 अंकांच्या वधारासह 59865 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 100 अंकांनी वाढत 17756 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभाग तेजीत दिसत होते. यामध्ये कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, टायटन, टाटा स्टील, इंडसइंड बँक,  सनफार्मा, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्री यांचा तेजी राखण्यामध्ये समावेश होता.

जागतिक बाजारामध्ये आज सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. याचाच काहीसा सकारात्मक परिणाम भारतीय शेअरबाजारामध्येही दिसून आला. अशियाई प्रमुख बाजारामध्येही मिश्र प्रमाणामध्ये कल दिसला होता. बुधवारी अमेरिकेतील बाजार कमकुवत दिसून आले होते. ब्रेन्ट क्रूड अर्थात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसू लागली आहे. सध्याला 96 डॉलर प्रति बॅरलवर कच्च्या तेलाचे दर पोहोचले आहेत. डीसीएक्स सिस्टम्स यांचा आयपीओ 28 ऑक्टोबरला बाजारामध्ये खुला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदरचा आयपीओ 40 टक्के प्रिमियमसह बाजारात लिस्ट होण्याचे संकेत तज्ञांनी बाजाराला दिले आहेत. ग्लँड फार्माचे समभाग गुरुवारी 13 टक्के घसरत 52 आठवडय़ानंतर निच्चांकी स्तरावर पाहोचले होते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  • जेएसडब्ल्यू स्टील. 679
  • हिंडाल्को………… 412
  • टाटा स्टील……… 104
  • अदानी पोर्टस्…… 821
  • पॉवरग्रीड कॉर्प…. 223
  • सनफार्मा……… 1011
  • भारती एअरटेल… 817
  • ऍक्सीस बँक…….. 915
  • टायटन………… 2703
  • ब्रिटानिया…….. 3755
  • एचडीएफसी….. 2383
  • डॉ. रेड्डीज लॅब्ज. 4491
  • कोटक महिंद्रा…. 1865
  • महिंद्रा अँड महिंद्रा 1294
  • हिरो मोटो कॉर्प. 2610
  • सिप्ला…………. 1165
  • ओएनजीसी…….. 131
  • टाटा मोटर्स…….. 407
  • लार्सन टुब्रो……. 1964
  • अदानी एंटरप्रायझेस 3325
  • डीव्हीज लॅब्ज…. 3621
  • अपोलो हॉस्पिटल 4431
  • एचसीएल टेक… 1032
  • एचयुएल………. 2519
  • इंडसइंड बँक….. 1142
  • मारुती सुझुकी… 9041
  • कोल इंडिया…….. 240
  • रिलायन्स……… 2451
  • अल्ट्राटेक सिमेंट. 6436
  • एचडीएफसी बँक 1454
  • एसबीआय ……… 579

समभाग घसरलेल्या कंपन्या

  • बजाज फायनान्स 6971
  • बजाज फिनसर्व्ह 1630
  • एशियन पेंटस्…. 3043
  • बजाज ऑटो…… 3622
  • नेस्ले………….. 20133
  • टेक महिंद्रा……. 1075
  • विप्रो…………….. 382
  • एसबीआय इन्शु. 1252
  • इन्फोसिस…….. 1523
  • टीसीएस………. 3157

Related Stories

फिनटेक बाजार उलाढाल 2025 पर्यंत 6.2 लाख कोटीवर पोहोचणार

Patil_p

अदानींची 29 हजार कोटींच्या आयपीओसाठी मोठी योजना

Amit Kulkarni

अदानी ग्रुप तिसऱया नंबरवर

Patil_p

एसबीआय बिगर बँकिंग कंपन्यांच्या मदतीने एमएसएमईला देणार कर्ज?

Omkar B

भारत दुसऱया क्रमांकाचा स्टील उत्पादक देश

Patil_p

पहिल्या सहामाहीत घरांच्या विक्रीत 49 टक्क्मयांची घसरण

Patil_p
error: Content is protected !!