Tarun Bharat

सेन्सेक्स-निफ्टी एक टक्क्यांनी घसरणीत

सलगची दुसरी घसरण ः जागतिक पातळीवर मिळता जुळता कल

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशीही मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक पातळीवर मिळताजुळता कल राहिल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने बाजारात दबाव राहिला होता. यावेळी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक 1 टक्क्यांनी प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 497.73 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 55,268.49 वर बंद झाले आहे. दुसऱया बजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 147.15 अंकांनी घसरुन निर्देशांक 16,483.85 वर बंद झाला आहे. याच दरम्यान सेन्सेक्स 562.79 इतका निच्चांकी स्तर पार केला हेता.

प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्स-मधील इन्फोसिस, ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, डॉ. रेड्डीज लॅब, विप्रो, कोटक महिंद्रा बँक आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे मुख्य समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प आणि बजाज फायनान्स यांचे समभाग मात्र लाभासह बंद झाले आहेत.

आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की हा काहीसा घसरणीसह बंद झाला. तर चीनचा शांघाय कम्पोजिट, दक्षिण कोरियाचा कॉस्पी व हाँगकाँगचा हँगसेंग हा तेजीसह बंद झाला आहे. युरोपमधील मुख्य बाजारांमध्ये सुरुवातीला घसरणीचा कल होता, मात्र नंतर त्यामध्ये मिळता जुळता कल राहिल्याचे दिसून आले. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 1.38 टक्क्यांनी वधारुन 106.6 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला आहे.

अमेरिकन फेडरल बैठकीचा प्रभाव

जागतिक पातळीवरील विविध घडामोंडीपैकी मंगळवारी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बैठकीला सुरुवात झाली आहे. यामध्ये पतधोरणात व्याजदरात 0.75 टक्क्यांची वृद्धी राहणार असल्याचा अंदाज आहे. यासह पश्चिमेकडील बाजारांमध्ये मंदीचे सावट निर्माण होत असल्यामुळे यांचाही परिणाम भारतीय बाजारावर आगामी काळात होणार असल्याचे संकेत अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Related Stories

कर्नाटकात ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण

Patil_p

मुख्यमंत्र्यांना कोरोना ः दिल्ली दौरा रद्द

Patil_p

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून माजी मंत्र्याला अटक

Patil_p

‘लावा’ भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

पश्चिम सीमेवर स्वदेशी ‘तेजस’ विमान तैनात

Patil_p

मृत्यूदर 1 टक्क्याखाली आणा !

Patil_p