Tarun Bharat

विक्रीच्या दबावात सेन्सेक्स-निफ्टी घसरले

सेन्सेक्स 185 अंकांनी प्रभावीत ः तेलाच्या किमतीचा प्रभाव

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात शेअर  बाजारात प्रारंभीची तेजी कायम ठेवण्यात बाजाराला अपयश आले आहे. दिवसभरातील कामगिरीत चढउताराच्या प्रवासात विक्रीचा दबाव राहिल्याने बीएसई सेन्सेक्स बुधवारी 185 अंकांनी घसरुन बंद झाला आहे.

दिवसभरातील मुख्य घडामोडींमध्ये जागतिक पातळीवरील घटनांमध्ये मिळता-जुळता कल राहिला. याच दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती उच्चांकी पातळीवर राहिल्याने जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपले भांडवल काढून घेतले आहे. याचा प्रतिकूल परिणाम बाजारावर राहिल्याचे दिसून आले आहे.

दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 185.24 अंकांनी म्हणजे 0.33 टक्क्यांनी घसरुन 55,381.17 वर बंद झाले आहे. यावेळी काही काळ सेन्सेक्स 474.98 अंकांनी नीच्चांकी पातळीवर कार्यरत राहिला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात 61.80 अंकांनी घसरुन निफ्टी 16,522.75 वर बंद झाला आहे.

मुख्या कंपन्यांपैकी नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह,सन फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवरग्रिड कॉर्प., अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स यांचे समभाग प्रामुख्याने घसरणीत राहिले आहेत.  अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे.  शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी 1,003.56 कोटी रुपयाच्या समभागांची विक्री केली आहे. जागतिक पातळीवर अन्य बाजारात चीनचा शांघाय कम्पोझीट आणि हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीत राहिले तर जपानचा निक्की हा लाभात राहिल्याचे दिसून आले. कच्चे तेल 1.49 टक्क्यांनी वधारुन 117.28 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

Related Stories

दिल्लीत दिवसभरात कोरोनाचे 72 नवे रुग्ण; 22 जणांना डिस्चार्ज!

Tousif Mujawar

राफेलच्या गर्जनेने चीन बिथरला

Patil_p

तामिळनाडूत एनडीआरएफची पथके सतर्क

Omkar B

सर्वोच्च न्यायालयाची ललित मोदींना फटकार

Amit Kulkarni

गुजरात समुद्रहद्दीतून पाकिस्तानी बोट जप्त

Patil_p

अस्वस्थ वाटू लागल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल

Archana Banage
error: Content is protected !!