बाजार सलग चौथ्या दिवशी घसरणीतच : आयटी, बँकिंग समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतामुळे भारतीय भांडवली बाजारात सलग चौथ्या दिवशी गुरुवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये आयटी व बँकिंग क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री झाल्याने दोन्ही निर्देशांकांनी आपली सुरुवातीची तेजी गमावली असल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स जवळपास 98.00 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.18 टक्क्यांच्या नुकसानीसह निर्देशांक 53,416.15 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 28.00 अंकांनी घसरुन निर्देशांक जवळपास 15,938.65 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक सर्वाधिक 1.74 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहे. यासोबतच एचसीएल टेक, स्टेट बँक, टेक महिंद्रा, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सनफार्मा, डॉ.रेड्डीज लॅब, मारुती सुझुकी, इंडिया कोटक बँक, टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
आशियातील इतर बाजारांपैकी चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी घसरणीत तर जपानचा निक्की लाभासह बंद झाला आहे. युरोपमधील बाजारात मात्र दुपारपर्यंत सत्र नुकसानीत राहिले होते.
अमेरिकेमधील चलन नियंत्रणासंदर्भात आकडे सादर होण्याची शक्यता असल्यामुळे ट्रेडिंगवर यांचा प्रभाव पडणार असून यामध्ये भारतीय बाजाराने आपली तेजी गमावली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष हे अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह यांच्याकडून चलनवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात कमीत कमी 0.75 टक्क्यांची वाढ करणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. या तर्कवितर्काच्या प्रवासात सेन्सेक्स व निफ्टी नुकसानीत राहिले आहेत.
जूनमध्ये देशांतर्गत चलनवाढीचा दर काही प्रमाणात कमी झाला असला तरी तो उच्च पातळीवरच राहिला असल्याचे दिसून आले. घाऊक किमत निर्देशांकांवर आधारीत चलनवाढ जूनमध्ये 15.18 टक्के होती, सलक 15 व्या महिन्यात घाऊक महागाईदर दोन अंकी राहिला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.97 टक्क्यांनी घसरुन 97.61 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- सनफार्मा……….. 880
- डॉ रेड्डीज लॅब… 4581
- कोटक महिंद्रा…. 1769
- मारुती सुझुकी… 8562
- टायटन………… 2128
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2396
- नेस्ले………….. 18386
- पॉवरग्रिड कॉर्प…. 215
- टाटा स्टील……… 908
- इंडसइंड बँक……. 820
- एचडीएफसी….. 2170
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1142
- एचपीसीएल……. 238
- ओएनजीसी…….. 127
- सीजी कंझ्युमर….. 389
- मॅक्स फायनान्स.. 838
- ब्रिटानिया…….. 3780
समभाग घसरलेल्या कंपन्या
- ऍक्सिस बँक…….. 668
- एचसीएल टेक….. 903
- स्टेट बँक…………. 479
- टेक महिंद्रा……… 975
- टीसीएस………. 2998
- विप्रो…………….. 401
- अल्ट्राटेक सिमेंट. 5732
- आयटीसी……….. 290
- इन्फोसिस…….. 1429
- बजाज फायनान्स 5835
- एचडीएफसी बँक 1351
- बजाज फिनसर्व्ह 11720
- भारती एअरटेल… 642
- एनटीपीसी……… 148
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1646
- आयसीआयसीआय 752
- एशियन पेन्ट्स.. 2939
- हिंदुस्थान युनि.. 2496
- ज्युबिलंट फूड…… 559
- पिरामल एन्टर.. 1666
- पीआय इंडस्ट्रीज 2876
- आयआरसीटीसी.. 585
- अशोक लेलँड……. 141
- अरोबिंदो फार्मा 553