Tarun Bharat

आयटी-धातूच्या कामगिरीने सेन्सेक्स मजबूत

 सेन्सेक्स 355 अंकांनी वधारला : सप्ताहातील अंतिम सत्र चढ-उताराची स्थिती

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारातील चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. यामध्ये विविध क्षेत्रांपैकी शुक्रवारी आयटी, धातू व रियल इस्टेट या क्षेत्रातील सकारात्मक कामगिरीचा फायदा हा भारतीय बाजाराला झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

अंतिम सत्रात मोठ्या चढ-उताराच्या प्रवासात बीएसई सेन्सेक्स अंतिम सत्रात 355.06 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 57,989.90 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 114.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,100.05 वर बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्समधील एचसीएल टेकचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.58 टक्क्यांनी वधारला आहे. यासोबतच वाहन व एफएमसीजी या क्षेत्रांना वगळता अन्य सर्व क्षेत्र तेजीत राहिल्याची नोंद केली आहे. यावेळी बीएसई मिडकॅप 0.3 तर स्मॉलकॅपचा निर्देशांक हा जवळपास 0.7 टक्क्यांच्या तेजीसोबत बंद झाला आहे.

सेन्सेक्समध्ये एचसीएल टेकसह अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी , एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, स्टेट बँक, विप्रो, अॅक्सिस बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा मोर्ट्स, टेक महिंद्रा. बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टायटन व बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.

दुसऱ्या बाजूला मात्र बाजारात आयटीसीचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 1.51 टक्क्यांनी प्रभावीत झाले असून यामध्ये मारुती सुझुकी, एनटीपीसी, एशियन पेंट्स, सनफार्मा व पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग हे जवळपास घसरुनच बंद झाले आहेत. आता सप्ताहातील अंतिम सत्रातील ही कामगिरी मजबूत राहिली असली तरी जागतिक पातळीवरील घडामोडी व आर्थिक तरतुदी आदीचा प्रभाव हा आगामी आठवड्यातील कामगिरीवर होणार असल्याचे संकेतही यावेळी अभ्यासकांनी दिले आहेत. 

Related Stories

मॅक्स वेंचर्स बांधकाम क्षेत्रात?

Patil_p

तिमाहीत दूरसंचार कंपन्यांचे उत्पन्न घटले

Patil_p

व्होडाफोन-आयडियाची सेवा नोव्हेंबरपासून होणार बंद?

Amit Kulkarni

वेदांताची उलाढाल पोहचणार 3 अब्ज डॉलर्सच्या घरात

Patil_p

शेअर बाजारात सलगची घसरण सुरुच

Amit Kulkarni

ई-कॉमर्स बाजाराला उज्ज्वल भविष्य

Patil_p