Tarun Bharat

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स मजबूत

Advertisements

सेन्सेक्स 92 अंकांनी वधारला ः सलगची दुसरी तेजी

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात सलग दुसऱया दिवशीच्या सत्रात बुधवारी सेन्सेक्स व निफ्टी तेजीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्सने जवळपास 92 अंकांची तेजी प्राप्त केली होती. यासोबतच जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये मजबूत कल राहिल्याने बँकांच्या समभागात लिलाव झाल्याचा फायदा  भारतीय शेअर बाजाराला झाला.

दिग्गज कंपन्यांमध्ये सेन्सेक्स दिवसअखेर 91.62 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.15 टक्क्यांसोबत 61,510.58 वर बंद झाला आहे. याच्या विरुद्ध बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 23.05 अंकांनी वधारत निर्देशांक 18,267.25 वर बंद झाला आहे. यात काही वेळ सेन्सेक्सने 361.94 अंकांचा उच्चांक प्राप्त केल्याची नोंद केली होती.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये भारतीय स्टेट बँक, बजाज फायनान्स, डॉ. रेड्डीज लॅब, कोटक महिंद्रा बँक, सनफार्मा, मारुती सुझुकी, एनटीपीसी, ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग लाभासह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, टेक महिंद्रा, टायटन, भारती एअरटेल आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग नुकसानीत राहिले होते.

जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये आशियातील बाजारात दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे लाभासह बंद झाले. तर युरोपीयन प्रमुख बाजारात सुरुवातीला तेजीचा कल राहिला होता.

याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.05 टक्क्यांनी वधारुन 89.29 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते. जागतिक बाजारात उत्साह असून याचा सकारात्मक परिणाम सध्या तरी बाजारात दिसतो आहे हा तेजीचा प्रवास कायम राहणार की नाही हे येणाऱया दिवसात समजून  येईल.

Related Stories

रियलमीचा नारजो 10 ए बाजारात

Patil_p

माहगाईचा उच्चांक

Omkar B

शेअर बाजारात तेजीची घोडदौड सुरुच

Patil_p

डय़ुकाटीची नवी गाडी बाजारात

Omkar B

अनिल अंबानींना न्यायालयाचा दिलासा

Patil_p

भारताची कच्च्या तेलाची मागणी 8 टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट

Omkar B
error: Content is protected !!