स्टेट बँक लाईफ मजबूत ः आशियातील बाजारांचाही राहिला प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारीही तेजीचा मोहोल कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्स 126 अंकांनी वधारत बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील वातावरणासोबत देशातील घडामोडींचाही सकारात्मक परिणाम भारतीय बाजारात होत गेल्याचे दिसून आले.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 126.41 अंकांनी वधारुन निर्देशांक 61,294.20 वर बंद झाला आहे. यासोबचत निफ्टी 35.10 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 18,232.55 वर स्थिरावला आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग हे मजबूत राहिले तर 12 समभाग हे घसरणीत राहिल्याची नोंद केली आहे.
एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ तेजीत
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत एचडीएफसी लाईफ, स्टेट बँक लाईफ, ऍक्सिस बँक, टायटन, टीसीएस, टेक महिंद्रा, सनफार्मा, इंडसइंड बँकेसह अन्य कंपन्या वधारुन बंद झाले आहेत. निफ्टी 50मधील 26 समभागात तेजी राहिली होते, यासह हिंडाल्को, जेएसडब्लू स्टील, ब्रिटानिया, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, ग्रासीम, टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हरसह अन्य निफ्टीमधील समभाग प्रभावीत होत बंद झाले.
बँक, आयटीची कामगिरी
एनएसईमधील 11 क्षेत्रातील निर्देशांकांमधील 7 क्षेत्र तेजीत राहिले. बँक, फायनाशिअल सर्व्हिसेस, आयटी, फार्मा, पीएसयू बँक, खासगी बँक व रियल्टी या क्षेत्रात सकारात्मक कामगिरी राहिल्याची नोंद केली आहे. दुसरीकडे वाहन, एफएमसीजी, मीडिया व धातू क्षेत्र घसरणीत राहिले.
मंगळवारच्या सत्रात भारतीय बाजार हळूवारपणे सकारात्मकतेकडे झुकल्याचे दिसून आले. यामध्ये निवडक क्षेत्रातील गुंतवणुकीच्या मदतीने गुंतवणूकदारांवर अमेरिकन बाजार,युरोपीयन निर्देशांक व अन्य बाजारापैकी आशियातील बाजारात तेजी राहिली. याचा लाभ हा भारतीय बाजाराला झाला असल्याचे अभ्यासकांनी यावेळी सांगितले आहे.