Tarun Bharat

सेन्सेक्स 80 हजाराची पातळी गाठणार ?

नवी दिल्ली

 विदेशातील ब्रोकरेट फर्म मॉर्गन स्टॅनले यांनी सेन्सेक्स डिसेंबर 2023 पर्यंत 80 हजाराच्या अंकांची पातळी गाठणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. शेअरबाजार गुंतवणूकदारांसाठी ही बातमी सुखावणारी नक्कीच म्हणता येईल.

पुढील 12 महिन्याच्या काळात भारतीय शेअरबाजारात जागतिक स्तरावर गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता स्टॅनले यांनी व्यक्त केली आहे. ग्लोबल बाँड निर्देशांकात भारताचा समावेश करण्यात आल्यास पुढील वर्षी अखेर सेन्सेक्स निर्देशांक 80 हजार अंकांपर्यंत मजल मारु शकतो, असा अंदाज फर्मने वर्तवला आहे. तेल व खताच्या किमती कमी होत असून सोबत लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ लक्षात घेता शेअर बाजार झेपावण्याच्या दिशेने आगेकुच करेल, असेही फर्मने म्हटले आहे.

Related Stories

जेफ बेजोस फोर्ब्सच्या यादीत अग्रस्थानी

Patil_p

दुसऱया दिवशी शेअर बाजार तेजीतच

Patil_p

ओएनजीसीचा तिमाहीत नफा वधारला

Amit Kulkarni

ऍमेझॉनची आयआरसीटीसीसोबत भागीदारी

Patil_p

एलआयसीकडून आनंदा मोबाईल ऍपचे सादरीकरण

Patil_p

टीसीएसचे सीईओ गोपिनाथन यांना 20 कोटीचे वेतन प्राप्त

Patil_p