बेळगाव : अनेक वर्षांची बेकिनकेरे गावची बससेवेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. शनिवारपासून गावाला स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी एक व सायंकाळी एक अशा दोन फेऱ्या सोडल्या जात आहेत. शनिवारी गावच्या बसस्थानकाजवळ गावकऱ्यांतर्फे बसचे पूजन करण्यात आले. तसेच बसवाहक व चालकाचा यांचा सत्कार करण्यात आला. गावाला स्वतंत्र बस सुरू करावी, यासाठी बेळगाव जिल्हा कामगार संघटनेतर्फे परिवहन मंडळाला निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत परिवहनने स्वतंत्र बससेवा सुरू केली आहे. सकाळी 9 वा. आणि सायंकाळी 5 वा. ही बस बेकिनकेरे गावाकडे धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी ॲड. एन. आर. लातूर, ॲड. निंगाप्पा मास्ती, ॲड. विनोद पाटील, राहुल पाटील, सुनील गावडे, ग्रा. पं. सदस्य गंगुबाई गावडे, राजू सावंत, भावकू सावंत, माजी तालुका पंचायत उपाध्यक्ष यल्लाप्पा गावडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
Previous Articleशिंदोळी क्रॉस-बसरीकट्टी रस्त्याची दुर्दशा
Next Article खड्डे भरण्याचा प्रयत्न की धूळफेक?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.