Tarun Bharat

उरुळी देवाची-फुरसुंगीसाठी स्वतंत्र नगरपालिका

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Separate municipality for Uruli Devachi and Fursungi उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे.

पाच वर्षांपूर्वी उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावं पुणे महापालिकेत समाविष्ट झाली होती. मालमत्ता कर घेऊनही या गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव होता. त्यामुळे नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर आक्षेप घेतला होता. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करत उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे पुणे महापालिकेतून वगळण्यात यावी, तसेच त्यांची स्वतंत्र नगरपरिषद करावी, अशी मागणी केली होती.

अधिक वाचा : कर्जाचा हप्ता वाढला! RBI कडून रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ

काल मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत दोन्ही गावांची लोकसंख्या दीड ते दोन लाखांच्या आसपास असून, गतीने विकास सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही गावांची मिळून नवीन नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे नगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

Related Stories

आम्हाला आमची जमीन परत पाहीजे- उद्धव ठाकरे

Abhijeet Khandekar

पिंपरी गोळीबार प्रकरण; राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुत्रावर गुन्हा दाखल

Archana Banage

अधिश बंगल्याबाबत राणेंची याचिका न्यायालयाने फेटाळली

Archana Banage

सातारा तालुक्यात कालपासून तीन जणांचा मृत्यू

Patil_p

कर्नाटक: राज्यात १७ सप्टेंबरला विशेष लसीकरण मोहीम

Archana Banage

5G सुपरफास्ट…लवकरच…!

Abhijeet Khandekar