Tarun Bharat

सेरेना, मेदवेदेव्ह, किर्गीओस, गॉफ तिसऱया फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था /न्यूयॉर्क

अमेरिकन ओपन स्पर्धेतून मागील दोन महिला चॅम्पियन्स बाहेर पडल्यानंतर आता मागील वर्षीची उपविजेती व उपांत्य फेरी गाठणाऱया खेळाडूंचे आव्हानही संपुष्टात आले आहे. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने तिसऱया फेरीत गाठली तर मारिया सॅकेरी, लैला फर्नांडेझ यांचे आव्हान समाप्त झाले. बियान्का ऍन्ड्रीस्क्यू, कोको गॉफ, मॅडिसन कीज, शेल्बी रॉजर्स, ऑन्स जेबॉर, पुरुष एकेरीत मेदवेदेव्ह, निक किर्गीओस, कॅस्पर रुड, टॉमी पॉल, होल्गर रुने यांनीही तिसरी फेरी गाठली तर कोन्टाव्हीट, बियाट्रिझ हदाद माइया पराभूत झाले. अमेरिकेच्या जॉन इस्नेरने दुखापतीमुळे माघार घेतल्याने रुनेला पुढे चाल मिळाली.

सेरेनाने द्वितीय मानांकित ऍनेट कोन्टाव्हीटचा तीन सेट्समध्ये 7-6 (7-4), 2-6, 6-2 असा पराभव केला तर तिसऱया मानांकित मारिया सॅकेरीला चीनच्या वांग झियूने 3-6, 7-5, 7-5 असे नमवित आगेकूच केली. मागील वर्षीची उपविजेती लैला फर्नांडेझला ल्युडमिला सॅम्सोनोव्हाने 6-3, 7-6 (7-3) असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले. फर्नांडेझने अलीकडेच पुनरागमन केले होते. उजव्या पावलामध्ये स्ट्रेस प्रॅक्चर झाल्यामुळे ती बराच काळ टेनिसपासून दूर राहिली होती. याआधी रॅडुकानू व ओसाका या मागील विजेत्यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले आहे. सॅकेरीने मागील वर्षी दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची उपांत्य फेरी गाठली होती.

गॉफ, मॅडिसन, जेबॉर, बियान्का विजयी

12 वी मानांकित कोको गॉफ व 20 वी मानांकित मॅडिसन कीज यांनी आगेकूच केली. गॉफने रोमानियाच्या इलेना गॅब्रिएला रुसेचा 6-2, 7-6 (7-4), तर मॅडिसन कीजने कॅमिला जॉर्जीचा 6-4, 5-7, 7-6 (8-6) असा पराभव केला. तिसऱया फेरीत गॉफ व कीज यांच्यात लढत होणार आहे. पाचव्या मानांकित टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरने एलिझाबेथ मंडलिकोव्हाचा 7-5, 6-2 असा पराभव केला. मागील तीन वेळा जेबॉरला या स्पर्धेच्या तिसऱया फेरीत पराभूत व्हावे लागले होते. तिची पुढील लढत अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सशी होणार आहे. 31 व्या मानांकित शेल्बीने क्हिक्टोरिया कुझमोव्हावर 7-5, 6-1 अशी मात केली. 2019 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या कॅनडाच्या बियान्का ऍन्ड्रीस्क्यूने तिसऱया फेरीत स्थान मिळविताना 15 व्या मानांकित बियाट्रिझ हदाद माइयाचा 6-2, 6-4 पराभव केला. तिसऱया फेरीत तिची लढत फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाशी होईल.

मेदवेदेव्ह, रुड तिसऱया फेरीत

पुरुष एकेरीत विद्यमान चॅम्पियन डॅनील मेदवेदेव्हने तिसरी फेरी गाठली. त्याने पूर्ण वर्चस्व राखत फ्रान्सच्या आर्थर रिन्डरक्नेचवर 6-2, 7-5, 6-3 अशी मात केली. दोन तास 11 मिनिटे ही लढत रंगली होती. सलग पाचव्यांदा त्याने या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली असून त्याची पुढील लढत चीनचा क्वालिफायर यिबिंग वु याच्याशी होणार आहे. नॉर्वेच्या कॅस्पर रुडने नेदरलँड्सच्या टिम व्हान रिजथोवेनचा 6-7 (4-7), 6-4, 6-4, 6-4 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या टॉमी पॉलशी त्याची पुढील लढत होईल. पॉलने आपल्याच देशाच्या सेबॅस्टियन कोर्दावर 6-0, 3-6, 4-6, 6-3, 6-4 अशी मात केली. डेन्मार्कच्या होल्गर रुनेनेही तिसरी फेरी गाठली. त्याला प्रतिस्पर्धी जॉन इस्नेरने दुखापतीमुळे माघार घेतल्याने त्याला पुढे चाल मिळाली.

ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसनेही तिसऱया फेरीतील स्थान निश्चित करताना फ्रान्सच्या बेन्जामिन बोन्झीचा 7-6, (7-3), 6-4, 4-6, 6-4 असा पराभव केला. किर्गीओसची पुढील लढत अमेरिकेच्या जेजे वुल्फशी होईल.

Related Stories

इंग्लंड संघाची घोषणा, रॉयचे पुनरागमन

Patil_p

प्रवीण कुमारला उंच उडीत सुवर्णपदक

Patil_p

कोलंबो स्टार्स चार गडय़ांनी विजयी

Patil_p

‘हाय-फ्लाईंग’ आरसीबीचे आज पंजाबसमोर आव्हान

Amit Kulkarni

‘त्या’ पार्टीनंतर युसेन बोल्ट ‘पॉझिटिव्ह’, ख्रिस गेल ‘निगेटिव्ह’

Patil_p

फुटबॉलपटू सुनील छेत्री कोरोना बाधित

Amit Kulkarni
error: Content is protected !!