वृत्तसंस्था/ टोरँटो
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या टोरँटो महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेची सेरेना विल्यम्स, इलेना रिबाकिना आणि रुमानियाच्या सिमोना हॅलेपने दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेचे तीनवेळा विजेतेपद मिळविणाऱया अमेरिकेच्या सेरेनाने सोमवारी पहिल्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या नुरिया डायझचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात रुमानियाच्या सिमोना हॅलेपने 61 मिनिटांच्या कालावधीत क्रोएशियाच्या डोना व्हेकीकचा 6-0, 6-2, कझाकस्तानच्या रिबाकिनाने झेकच्या बोझकोव्हाचा 7-5, 6-7(3-7), 6-1, ओस्टापेंको, झेकची प्लिसकोव्हा यांनीही दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेत कॅनडाच्या लैला फर्नांडिसने टेनिस क्षेत्रामध्ये दुखापतीनंतर यशस्वी पुनरागमन केले आहे. 19 वर्षीय फर्नांडिसने स्टॉर्म सँडर्सचा 6-4, 6-7(2-7), 6-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. मध्यंतरी दुखापतीमुळे कॅनडाच्या फर्नांडिसला काही महिने टेनिस क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळताना तिच्या पायाला दुखापत झाली होती.