Tarun Bharat

यजमान झिम्बाब्वेचा बांगलादेशवर मालिकाविजय

Advertisements

वृत्तसंस्था /हरारे

यजमान झिम्बाब्वेने बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील येथे बुधवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने झिम्बाब्वेचा 105 धावांनी दणदणीत पराभव केला. बांगलादेशच्या अफिफ हुसेनला सामनावीर तर झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 256 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 32.2 षटकात 151 धावात आटोपला.

बांगलादेशच्या डावामध्ये अनामुल हकने 71 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 76, कर्णधार तमिम इक्बालने 3 चौकारांसह 19, मेहमुदुल्लाने 69 चेंडूत 3 चौकारांसह 39, अफिफ हुसेनने 81 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 85 धावा झळकविल्या. मेहदी हसन मिराजने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. बांगलादेशच्या 4 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. बांगलादेशची एकवेळ स्थिती 3 बाद 47 अशी केविलवाणी होती. अनामुल हक आणि मेहमुदुल्ला यांनी चौथ्या गडय़ासाठी 77 धावांची भागीदारी केली. अनामुल हक बाद झाल्यानंतर मेहमुदुल्लाने अफिफ हुसेनसमवेत पाचव्या गडय़ासाठी 49 धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या शेवटच्या फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. त्यांच्या डावात 6 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे ब्रॅड इव्हान्स आणि जाँगवे यांनी प्रत्येकी 2 तर एन्गराव्हा, सिकंदर रझा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बांगलादेशचे तीन फलंदाज धावचीत झाले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या डावात एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर बांगलादेशने झिम्बाब्वेला 32.2 षटकात 151 धावात गुंडाळले. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या एन्गराव्हाने 27 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 34 तर एन्वायुचीने 31 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. या जोडीने शेवटच्या गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी केल्याने झिम्बाब्वेला 151 धावांपर्यंत मजल मारता आली.

क्लाईव्ह मदान्देने 4 चौकारांसह 24, जाँगवेने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या डावात 2 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे मुश्तफिजूर रेहमानने 17 धावात 4, इबादत हुसेन आणि तैजूल इस्लाम यांनी प्रत्येकी 2 तसेच हसन मेहमूद आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या वनडे मालिकेपूर्वी झालेल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने बांगलादेशचा 2-1 असा पराभव केला.

आता झिम्बाब्वेमध्ये 18 ऑगस्टपासून भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सामने हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळविले जातील.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 50 षटकात 9 बाद 256 (अफिफ हुसेन नाबाद 85, अनामुल हक 76, मेहमुदुल्ला 49, तमिम इक्बाल 19, मेहदी हसन मिराज 14, इव्हान्स 2-53, जाँगवे 2-38, एन्गराव्हा, सिकंदर रझा प्रत्येकी 1 बळी), झिम्बाब्वे 32.2 षटकात सर्वबाद 151 (केया 10, मदान्दे 24, मुनयोंगा 13, जाँगवे 15, एन्गराव्हा नाबाद 34, एन्वायुची 26, मुस्तफिजूर रेहमान 4-17, इबादत हुसेन 2-38, टी. इस्लाम 2-34, हसन मेहमूद 1-38, मेहदी हसन मिराज 1-16).

Related Stories

रणिंदर सिंग यांची अध्यक्षपदी फेरनिवड

Patil_p

बांगलादेश संघात शकीब अल हसनचे पुनरागमन

Patil_p

डे-नाईट कसोटीला 27 हजार प्रेक्षकांना परवानगी

Patil_p

ब्रॅडी, साबालेन्का उपांत्य फेरीत

Patil_p

मँचेस्टर सिटीचा बर्नलीवर मोठा विजय

Patil_p

पाककडून विंडीजला 329 धावांचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!