Tarun Bharat

रेशनकार्ड कामात सर्व्हरडाऊनची समस्या

अर्ज निकालात काढण्यासाठी महिन्यातील काही दिवस खात्याकडून निश्चित

बेळगाव : नवीन रेशनकार्ड वितरणाला चालना मिळाली आहे. मात्र हे अर्ज निकाली काढताना अनेक ऑनलाईन अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी टाळण्यासाठी अन्न व नागरी खात्याने दर महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत सायंकाळी 5 ते रात्री 8 ही वेळ निश्चित केली आहे. या काळात नवीन बीपीएल रेशनकार्ड वितरणातील त्रुटी दूर करून काम सुरळीत केले जाणार आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार, आरोग्यकार्ड, जात उत्पन्नाचा दाखला आणि रेशनकार्ड महत्त्वाचे आहे. या सर्व कागदपत्रांसाठी वेबसाईटवरच अवलंबून रहावे लागते. मात्र सर्व्हरडाऊन असल्याने या कामात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी रेशनकार्ड वितरणाचे काम संथगतीने सुरू आहे. तर काहीवेळेला काम ठप्प होत आहे. अशा परिस्थितीत अन्न व नागरी पुरवठा खात्याने दर महिन्यातील काही दिवस सायंकाळच्या वेळेत कार्ड वितरणाचे काम हाती घेतले आहे. सायंकाळच्या वेळेत सर्व्हरडाऊनच्या समस्या निर्माण होणार नाहीत. या दृष्टिकोनातून महिन्यातील काही दिवस सायंकाळच्या वेळेत रेशनकार्ड वितरणाचे काम चालणार आहे.

सातत्याने सर्व्हरडाऊनमुळे नवीन शिधापत्रिका वितरणास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्जाची फेरतपासणी आणि मंजुरीसाठी सायंकाळी वेळ निश्चित करण्यात आली आहे. यावेळेत नवीन अर्जांची तपासणी करून रेशनकार्ड वितरणाला चालना दिली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोफत धान्यांचे वितरण केले जात आहे. मात्र अद्यापही काही लाभार्थ्यांकडे बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्ड नसल्यामुळे धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. अशा अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना रेशनकार्ड वितरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सर्व्हरडाऊनमुळे कामात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यासाठीच खात्याने महिन्यातील काही दिवस कार्ड वितरणासाठी निश्चित केले आहेत. बेळगाव जिल्ह्यात 79,687 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 51,605 अर्जांना मंजुरी मिळाली आहे. तर 23,481 अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

सर्व्हरडाऊनमुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. त्याचबरोबर कार्ड वितरणात अडचणी आल्या आहेत. यासाठी दर महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत अर्ज निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

-श्रीशैल बी. कंकणवाडी, सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते

Related Stories

बसमधील वाढती गर्दी चिंताजनक

Amit Kulkarni

लीजवाढीसाठी अर्ज न केल्यास करार रद्द

Amit Kulkarni

महामेळावा यशस्वी करणारच

Amit Kulkarni

तिसऱया रेल्वेगेट परिसरात धुळीमुळे नागरिक त्रस्त

Amit Kulkarni

अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षणामध्ये वाढ करा

Amit Kulkarni

पेंढारकर स्मृती नाटय़ अभिवाचन स्पर्धेत रंगभूमी ग्रुप उत्तेजनार्थ

Patil_p