नागरिकांचा प्रश्न, रस्त्यावर मद्यपानचा प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी परिसरातील सर्व्हिस रस्त्याची स्वच्छता करून पार्किंगसाठी उपयोग करण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे काही वाहने सर्व्हिस रस्त्यहवर पार्किंग करण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी रस्त्याचा वापर मद्यपानासाठी केला जात असून याठिकाणी मद्याच्या बाटल्यांचा खच साचला आहे. त्यामुळे सर्व्हिस रस्ता की, मद्यपी रोड असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
टिळकवाडी येथील आरपीडी कॉर्नर दरम्यान असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर महाविद्यालयीन विद्यार्थी मद्यप्राशन करून रिकाम्या बाटल्या तसेच कचरा फेकत आहेत. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याला कचराडेपोचे स्वरूप आले आहे. वास्तविक पाहता, परिसरात कचरा टाकणाऱयांना समज देऊन कचरा टाकण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांना रस्त्याचा वापर व्हावा या उद्देशाने या सर्व्हिस रस्त्यावर पेव्हर्स ब्लॉक घालण्यात आले आहेत. मात्र सध्या याठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले असून दुर्गंधी पसरली आहे. तसेच रस्त्याचा वापर सध्या मद्यपानासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मद्याच्या बाटल्या साचल्या आहेत.
याकडे महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. सर्व्हिस रस्त्याच्या स्वच्छतेची मागणी सातत्याने करूनही मनपा प्रशासनाने कानाडोळा केला आहे. शेजारी राहणाऱया नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कचऱयामुळे डांसाचा उपद्रव वाढला असून रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱयांनी विशेष लक्ष दिल्यास होणारा त्रास कमी होईल, अशा प्रतिक्रिया येथील नागरिक व व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.