आमदार आलेक्स रेजीनाल्ड लॉरेन्स
प्रतिनिधी /पणजी
कुडतरी माकाजान येथली सुमारे चार लाख चौरस मिटर जमीन कुष्टरोग इस्पितळ बांधण्यासाठी सरकारला दान देण्यात आली होती. ती जागा तशीच पडून आहे. जागेत घुसखोरी सुरु झाली असून जागेतील मोठमोठी झाडे कापून नेण्यात आली आहे. या जागेत सांकृतिक केंद्र किंवा वाचनालय सारख्या एखादा चांगला प्रकल्प उभारून त्याला पद्मभूषण डॉ. झुजे परेरा यांचे नाव द्यावे असा खाजगी ठराव कुडतरीचे आमदार आलेक्स रेजीनाल्ड लॉरेन्स यांनी मांडला होता.
पद्मभूषण जुझे परेरा हे एक विध्वान तसेच चांगले कलाकार होत त्यांना 13 भाषांचे न्यान होते. गोव्याची कला आणि संस्कृतीसाठी भरीव काम केले होते. त्यामुळे 2012 साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत केले होते. अशा व्यक्तीची ओळख पुढच्या पीढीला असणे गरजेचे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा युवक प्रय़त्न करतील त्यामुळे त्यांच्या नावाने एखादा प्रकल्प उभारावा असे मत मांडून काही आमदारांनी ठरावाला समर्थन दिले होते.
ठारावाला उत्तर देताना सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे म्हणाले की कुडतरी परीसरात रविंद्र भवन सारखी अनेक सांकृतिक केंद्रे आहेत. तसेच खाजगी सांस्कृतिक केंद्रानाही सरकारन निधी देत असते. पेडणे, म्हापसा आणि केपे याभागात रविंद्र भवन उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून त्या कामाना प्रधान्य देण्यात येईल पढे मग कुडतरी भागात काय करायचे त्याचा विचार केला जाईल असे गोविंद गावडे यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून म्हाखान कुडतरीतील जमीन कुणाच्या घशात जात आहे आणि कोण घुसखोरी करीत आहे त्याचा शोध अगोदर लावणे गरजेचे आहे. याकामाला लवकरात लवकर सुरुवात करून घुसखोरी करणाऱयांवर कारवाई करण्यात येईल व जमीन सरकार ताब्याघेईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. नंतर कोणात प्रकल्प उभारायचे ते ठरवण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आमदार आलेक्स रेजीनाल्ड लॉरेन्स यांनी ठाराव मागे घेतला.