नवी दिल्ली
ः गुजरातमध्ये 2002 च्या दंगलीत कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिस्ता सेटलवाड यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात 22 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती यु. यु. लळीत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 2002 च्या दंगल प्रकरणात निरपराध लोकांना अडकविण्यासाठी पुरावे तयार केल्याचा आरोप सेटलवाड यांच्यावर आहे. गुजरात पोलिसांनी जूनमध्ये त्यांना मुंबईतून अटक केली होती. सेटलवाड या सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहेत.