Tarun Bharat

अपहरणप्रकरणी सात जणांना अटक

मुरगोड पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

इनोव्हा कारमधून जाताना सोप्पडल येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याजवळून 1 लाख रुपये खंडणी उकळल्याच्या आरोपावरून मुरगोड पोलिसांनी सात जणांच्या टोळीला अटक केली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. सात जणांना अटक करून त्यांच्याजवळून 60 हजार रुपये रोख रक्कम एक चाकू, 6 मोबाईल संच व अपहरणासाठी वापरण्यात आलेली सुमारे 5 लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे.

रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली, लक्ष्मी बिरादार, के. बी. अलगराऊत, एम. बी. सन्ननायक, एच. आर. न्यामगौडर, एम. एस. औरादी, रमेश ससालट्टी, विठ्ठल मुरगोड, अब्बास गोकाक आदींनी ही कारवाई केली आहे.

बाळेश होंडप्पण्णावर, नागाप्पा रंगण्णावर, इम्रान मुल्ला, मल्लाप्पा कोमार, रमेश चंदरगी, बंदेनवाज अत्तार, श्रीशैल होंडप्पण्णावर अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. 2 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. एका व्यापाऱ्याची इनोव्हा अडवून त्याचे अपहरण करून सुटकेसाठी मोठी रक्कम मागण्यात आली होती. 1 लाख रुपये घेऊन त्याची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे.

Related Stories

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा आदेश

Amit Kulkarni

लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढविली

Tousif Mujawar

एकदंत युवक मंडळातर्फे वर्धापनदिनानिमित्त अन्नधान्याचे वाटप

Patil_p

बुक लव्हर्स क्लबच्या कार्यक्रमात ‘महाभारतातील स्त्रिया’ पुस्तकाचा परिचय

Amit Kulkarni

चव्हाट गल्लीत सॅनिटायझरची फवारणी

Amit Kulkarni

कोरोना नियमांचे पालन करून बी-बियाणांची खरेदी करा

Patil_p