Tarun Bharat

आमदार कैलास पाटीलांचे उपोषण मागे, उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय

ऑनलाईन टीम/भारत

उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (Mla Kailas Patil) यांचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेले सहा दिवस सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा केल्यांनतर आमदार पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे बोलले जात आहे. पीक विमासह (Pik Vima) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार पाटील उपोषणास बसले होते.

दरम्यान, पीक विमासह (Pik Vima) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली. त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ddevendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा केली. चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे.

Related Stories

जिल्हा रुग्णालयातील आरटी-पीसीआर यंत्रणा बंद

Patil_p

फडणवीस सरकार चालवतात अन् बाकीचे मंत्री फक्त बारशासाठीच

Patil_p

पुणे विभागातील 5 लाख 52 हजार 342 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही केले पार्टी

Archana Banage

महाराष्ट्र : अन्यथा दोन दिवसात लॉकडाऊनचा निर्णय

Archana Banage

मेक्सिकोनंतर थायलंडमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याकडून अंदाधुंद गोळीबार, ३४ ठार

Archana Banage