प्रमोद सावंत यांच्या हस्ते उदघाटन, ’व्होयेजर्स’ या चित्रपटाने उघडणार महोत्सवाचा पडदा
प्रतिनिधी /पणजी
येथील गोवा मनोरंजन संस्थेत सातवा भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव आजपासून सुरू होणार असून महोत्सवाचा उदघाटन सोहळा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर नील बर्गर दिग्दर्शित ’व्होयेजर्स’ या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडणार आहे.
’व्होयेजर्स’ हा सायन्स फिक्शन चित्रपट आहे. पृथ्वीवरील बदलते वातावरण आणि कमी होत चाललेला राहणीमान, यामुळे एक्सोप्लॅनेटवर (सूर्यमालेच्या बाहेरील ग्रह) वसाहत निर्माण करण्यासाठी किशोरवयीन अंतराळवीरांचा एक गट करून मोहिमेवर पाठवला जातो. या मोहिमेदरम्यान होणारी मनाची घालमेल, आव्हाने यावर हा चित्रपट आधारित आहे.
महोत्सवादरम्यान प्रत्येक चित्रपटानंतर ख्यातनाम वैज्ञानिक इस्त्राsचे डॉ. टी. पी. दास, होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचे डॉ. नरेंद्र देशमुख, आयआयटी मुंबईचे डॉ. पी.के.जोशी, पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्चचे डॉ. अरविंद नातु आणि डॉ. अरविंद रानडे चित्रपटातील वैज्ञानिक संकल्पनेची माहिती देणार आहेत. याशिवाय प्रेक्षकांना वैज्ञानिकांशी संवाद साधता येणार आहे.
तीन दिवस चालणाऱया या महोत्सवात राज्यभरातील ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. विज्ञान चित्रपटांशिवाय नामवंत शास्त्रज्ञांशी संवाद, विविध वैज्ञानिक संस्था?चे प्रदर्शन, विज्ञान शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आणि विज्ञान चित्रपट स्पर्धा असणार आहे.
महोत्सवातील चित्रपट असेः
- व्होयेजर्स
- मॅड मॅक्सः फ्युरी रोड
- रेडी प्लेयर वन
- रॅम्पेज
- मूनफॉल
- गॉडझिला : किंग ऑफ द मॉन्स्टर्स
- कार्गो
महोत्सवातील चित्रपटांमध्ये ऐनवेळी बदल होऊ शकतो.