Tarun Bharat

सत्तरीत दहा बांगलादेशींना अटक

Advertisements

भुईपाल, सालेली, नागवे येथे होते वास्तव्य : येत्या दोन दिवसांत मोहीम होणार तीव्र

वाळपई / प्रतिनिधी

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बंगलादेशी घुसखोरांविरोधात कडक कारवाई करताना बुधवारी नागवे या ठिकाणी अटक करण्यात आलेल्या बिलाल अन्वर आखोन याच्याकडे चौकशी करण्यात आल्यानंतर वाळपई पोलिसांनी काल गुरुवारी तब्बल दहा बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. नागवे, भुईपाल, सालेली याठिकाणी हे घुसखोर वास्तव्य करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 बिलाल अन्वर आखोन याच्याकडून पोलिसांना धक्कादायक माहिती उपलब्ध झालेली आहे. सत्तरी तालुक्मयात ज्या ज्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर वेगवेगळय़ा प्रकारचे काम करीत आहे त्या संदर्भाची सविस्तर माहिती पोलिसांना उपलब्ध झालेली आहे. काल गुरुवारी दिवसभर या संदर्भाची चौकशी वाळपई पोलीस यंत्रणा करीत होती. त्यातून ज्या ज्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर कार्यरत आहेत त्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये सत्तरी तालुक्मयातील बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम तीव्र करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 दिवसभरात दहाजणांना अटक

 गुरुवारी दिवसभरातील चौकशीत भुईपाल येथून 4, सालेली भागातून 3 तर नागवे येथून पुन्हा आणखी तिघांना मिळून एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. सालेली येथील फार्मवर हे तीन बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे सदर भागांमध्ये खळबळ निर्माण झाली असून तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये बांगलादेशी वास्तव्य करून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एटीएम फोडणाऱयांना बिलालने दिला जामीन व आश्रय

 गेल्या काही महिन्यांपूर्वी गोव्यामध्ये वेगवेगळय़ा बँकांचे एटीएम फोडण्याचे प्रकार सातत्याने घडू लागले होते. यामध्ये बांगलादेशी नागरिकांचा समावेश असण्याची शक्मयता वर्तवली जात होती. ज्या बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बँकांचे एटीएम फोडण्याच्या गुन्हय़ाखाली अटक करण्यात आली होती त्यापैकी अनेक जणांना बिलाल आखोन याने जामीन देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला होता. तसेच गुन्हय़ामध्ये ज्या संशयितांचा समावेश होता त्यापैकी काही संशयितांना नागवे या ठिकाणी बिलाल याने लपवून ठेवले होते, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. बिलाल आखोन याचा दहशतवादी कारवायांमध्ये समावेश असण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.

Related Stories

बालभवन, मिरामार रस्त्यावरील गटारांची महापौरतर्फे पाहणी

Omkar B

खलाशांना गोव्यात आणण्याबाबत लक्ष घालणार

Omkar B

युनायटेड वॅटरन्सचा सरपंच इलेव्हन संघावर विजय

Amit Kulkarni

भाजपची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड – कामत

Amit Kulkarni

फोंडा येथील केशव देव समितीतर्फे 2 एप्रिलपासून ‘श्री राम कथा’

Amit Kulkarni

कमिशनसाठी मंत्री गुदिन्होंची मीटर सक्ती

Patil_p
error: Content is protected !!