Tarun Bharat

पुण्यात 10 लाखांचे सेक्स टॉईज जप्त

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Sex toys worth 10 lakhs seized in Pune पुण्यात लष्कर पोलिसांनी एका गोडाऊनवर छापा टाकत तब्बल 10 लाख रुपये किंमतीचे सेक्स टॉईज जप्त केले आहेत. ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून या सेक्स टॉईजची विक्री होत होती. त्यामुळे पुण्यातील तरुणाईला सेक्स टॉईजचे वेड लागलेय की काय? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

याप्रकरणी एकावर लष्कर पोलीस ठाण्यात 292 (ऑफ सीन मटेरीअल बाळगणे) आणि 293 (लहान मुलांकडून खरेदी होईल माहिती असताना विक्री करणे) कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : कोरोनावरील 100 दशलक्ष लशी मुदतबाह्य

एका संकेतस्थळावर सेक्सटॉईजची विक्री होत असल्याची माहिती लष्कर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पुण्यातील पुलगेट चौकीच्या बाजुला असलेल्या भाजी बाजारच्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तब्बल 10 लाखांचे सेक्स टॉईज जप्त करण्यात आले. पोलिसांनी गोडाऊनमधील एका व्यक्तीला ताब्यात घेत हा सर्व मुद्धेमाल जप्त केला. काही अल्पवयीन मुलांना हे सेक्स टॉईज विकले जात होते का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये: मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश

Archana Banage

”1 मे पासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता, पण…”

Archana Banage

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पुण्यातील चार नृत्य समुहांचा सहभाग

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 47 रूग्ण

prashant_c

50 वर्षांचा घोडा झाला तरी त्याला गोळवलकर म्हणता येईना; शरद पोंक्षेचा राहुल गांधींना टोला

datta jadhav

फडणवीस..आपसे ये उम्मीद न थी….- सुप्रिया सुळे

Abhijeet Khandekar