Tarun Bharat

‘आयटी’तील विक्रीने सेक्सेक्स 390 अंकांवर घसरला

आठवडय़ाच्या कामगिरीतही नुकसान ः जागतिक बाजार तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ात भारतीय भांडवली बाजारात अंतिम दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स जवळपास 390 अंकांनी घसरला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमध्ये सकारात्मक राहिल्याच्या नंतरही माहिती तंत्रज्ञान व ऊर्जा क्षेत्रातील समभागात विक्री राहिल्याने बाजारात घसरणीची नोंद करण्यात आली. यासह कच्च्या तेलाचे भाव तेजीत व सलगचे भांडवल काढून घेण्यात आल्याने सह नकारात्मक परिणाम भारतीय बाजारात झाल्याचे दिसून आले.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्समध्ये सुरुवातीला चांगली स्थिती होती परंतु अंतिम टप्प्यात विक्रीच्या दबावामुळे बीएसई सेन्सेक्स 389.01 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 62,181.67 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 112.75 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 18,496.60 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्सधील समभागांमध्ये एचसीएल टेक सर्वाधिक 6.72 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून यासोबतच टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, टायटन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज लॅब, इंडसइंड बँक आणि आयटीसी यांचे समभाग हे 2.24 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत.

शुक्रवारच्या सत्रात आयटी क्षेत्रातील विक्रीच्या दबावामुळे बाजारात घसरण राहिली आहे. यासह जागतिक पातळीवरील नकारात्मक व मंदीच्या सावटामुळे बाजारात नरमाईचा कल राहिल्याने चिंतेचे वातावरण राहिल्याने शेअर बाजारात नुकसानीत राहिल्याची नोंद केली आहे.

याच दरम्यान जागतिक शेअर बाजारात तेजी राहिली, मात्र विविध घडामोडींमुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आगामी आठवडय़ात पतधोरण बैठकीत 0.50 टक्क्यांनी व्याजदर वाढविण्याची शक्यता व्यक्त करत आहे. यामुळे याचा परिणामही शेअर बाजारावर होणार असल्याची शक्यता शेअर बाजार तज्ञ व्यक्त करत आहेत. 

Related Stories

विप्रोची वर्क फ्रॉम होम मोहीम 4 एप्रिलपर्यंत

Patil_p

स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स भारी

Patil_p

टायर निर्यातीत 50 टक्के वाढ : वाणिज्य मंत्रालय

Patil_p

कोरोनाच्या धास्तीने विस्कटली आर्थिक घडी

tarunbharat

पेटीएम आयपीओला थंडा प्रतिसाद

Patil_p

भारतीय कंपन्या बाजारमूल्यात अव्वल ठरण्याचे संकेत

Patil_p