प्रतिनिधी /पेडणे
जुनासवाडा मांदे येथे समुद्र किनाऱयाजवळ असलेल्या एका शॅकला बुधवार दि. 25 मे रोजी दुपारी आग लागली. आगीत शॅकाचे बरेच सामान जळून खाक झाले असून सुमारे सात लाख रुपयांची हानी झाली असल्याचे शॅक मालकांनी सांगितले.
लक्ष्मीकांत आणि सदगुरू नाईक यांच्या मालकीचे हे शॅक जुनासावाडा, मांदे येथे आहे. मांदेत शॅकला आग लागल्याची बातमी पेडणे अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षला कळताच अग्निशामक दलाचे अधिकारी जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. वेळ न घालवता अग्निशामक दलाचे सहायक अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या सह जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. श्Ÿाकच्या ठिकाणी जाणारा रस्ता अरुंद असल्यामुळे अग्निशामक दलाची गाडी आत जात नव्हती. अग्निशामक दलाच्या जवानांनी दूरवर गाडी उभी करून लोकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवले.
शॅकला लागलेल्या या आगीत चार मोठे रेफ्रिजरेटर, आठ गॅस शेगडय़ा व गॅस सिलेंडर, फुर्निचर, स्वयंपाकाचे सामान, टेबल्स् व खुर्च्या ,भांडी आणि इतर बरेच समान जाळून खाक झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणून बाजूच्यांना नुकसान होण्यापासून वाचविले. या घटनेत अग्निशामक दलाचे सहायक अधिकारी प्रशांत धारगळकर, चालक शैलेश हळदणकर, जावान यशवंत नाईक, अमित सावळ, आशीर्वाद गाड यांनी कामगिरी केली.