वृत्तसंस्था/ लाहोर
शारजामध्ये पाकिस्तान आणि अफगाण यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 24 मार्चपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी पीसीबीने संघातील ज्येष्ठ खेळाडू कर्णधार बाबर आझमसह शाहीन आफ्रिदी यांना विश्रांती दिली आहे. या मालिकेसाठी शादाब खानकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
या आगामी मालिकेसाठी पीसीबीच्या निवड समितीने मोहम्मद रिझवान, हॅरिस रौफ आणि फक्र झमान यांचाही विचार केला नाही. दरम्यान, वेगवान गोलंदाज एहसानउल्ला, झमान खान तसेच फलंदाज तय्यब ताहिर आणि सईम अयुब या चार नवोदितांना संघात संधी दिली आहे.
पाक संघ- शादाब खान (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आझम खान, फहीम अश्रफ, इफ्तिकार अहमद, एहसानउल्ला, इमाद वासीम, मोहम्मद हॅरीस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वासीम ज्युनि., नसीम शहा, सईम अयुब, शान मसूद, तय्यब ताहिर, झमान खान, राखीव खेळाडू- अब्रार अहमद, हसिबुल खान आणि ओसामा मीर.